Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर...
दोन पायावर येशील आणि स्ट्रेचरवर जाशील! वारीस पठाण यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल
Waris Pathan on Nitesh Rane : एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची आज अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) मुकुंदनगरच्या सी.आय.व्ही ग्राउंडवर ओवैसींची जाहीर सभा झाली. या सभेत एमआयएमचे नेते वारीस पठाण (Waris Pathan) यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालं. येशील दोन पायावर आणि जाशील स्ट्रेचरवर असे म्हणत वारीस पठाण यांनी मंत्री नितेश राणेंवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीवर दडफेक, 8 दिवसांपूर्वीच आलं होतं धमकीच पत्र; सांगली जिल्ह्यात खळबळ
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे (NCP) विधानपरिषदेचे आमदार (MLA) इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात दौऱ्यावर असताना चाबुकस्वार वाडीजवळ (Sangli) त्यांच्या कारचा ताफा आला असता अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सुदैवाने या दगडफेकीत आमदार महोदयांना, आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कुठलीही जखम झाली नाही. मात्र, लोकप्रतिनिधींवरील या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Pune: पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या; शहरात एकच खळबळ
Pune: पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या
NDA च्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ
अंतरीक्ष कुमार असे आत्महत्या केलेलया विद्यार्थ्याचे नाव आहे
१८ वर्षीय अंतरीक्ष कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे
आज पहाटे अंतरीक्ष ने त्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, १८ वर्षीय अंतरीक्ष हा मूळ उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचे वडील सुद्धा माजी सैनिक आहेत. तो सध्या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये शिक्षण घेत होता. जुलै महिन्यात त्याने एन डी ए मध्ये प्रवेश घेतला होता आणि पहिल्या सत्रात शिकायला होता.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे त्याने त्याच्या खोलीतील बेडशीट ने गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले. आत्महत्या नेमकी त्याने का केली याचे कारण समजू शकलेले नाही
उत्तमनगर पोलिस यांच्याकडून तपास सुरू
क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठी जबाबदारी
- क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठी जबाबदारी
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून कोकाटे यांची निवड
- नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्याचे कोकाटे संपर्कमंत्र
- नाशिकला पालकमंत्री नाही, पक्षाचे वरीष्ठ मंत्री छगन भुजबळ नाशिक चेच असताना नाशिकचे संपर्कमंत्री म्हणून कोकाटे यांची निवड
- पक्ष संघटना मजबूत करण्यासोबत निवडणुकीत जास्तीत जास्त यश मिळवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे कोकाटे यांना पक्षाचे आदेश
























