एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेत भाजपचा स्वबळाचा नारा; आरपीआय आणि छोट्या पक्षांना सोबत घेणार

मनसेसोबत (MNS) युती न करता भाजपने (BJP) मुंबईत स्वबळावर सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत

 मुंबई : शिवसेनेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) युती होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून मुंबई महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावरच लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  मनसेसोबत युती न करण्याच्या मुद्द्यावर भाजपने एकमत झाले असून  स्वबळावर सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांची रणनीती ठरवण्यासाठी फडणवीसांच्या निवासस्थानी आज  भाजपने बैठक बोलवली होती. या बैठकीत  हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये मनसे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत सोबत घ्यावं का? या भोवतीचा मुद्दा चर्चेला आला.  पण  स्वबळावर महापालिका निवडणूक लढवू आणि एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न करा अशा सूचना देखील देवेंद्र फडणीस यांनी आजच्या बैठकीत दिल्या आहेत. एबीपी माझा सूत्रांनी ही माहिती दिली. भविष्यात शिवसेनेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचे आदेश देखील फडणीस यांनी आजच्या बैठकीत दिले आहे. तसेच भाजप आरपीआय सारख्या छोट्या पक्षांना सोबत घेण्याची शक्यता आहे. 

मुंबई महानगपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी वॉर्डांची संख्या 227 वरुन 236 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजपला शंभरहून जास्त नगरसेवक निवडून आणणे गरजेचे आहे. मुंबईतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद पाहता हे भाजपसाठी मोठे आव्हान असेल. अशावेळी भाजपकडून मुंबईत मनसेची मदत घेतली जाऊ शकते, अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या.  गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे अनेक प्रमुख नेते मनसेप्रमुख राज ठाकरे यांना भेटले. मात्र, या भेटींमधून महानगरपालिका निवडणुकीसाठीची बोलणी पार पडली का, याविषयी निश्चित माहिती नाही. परंतु, आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिल्याने भाजप-मनसे युतीबाबातच्या  चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 16  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Embed widget