कौतुकास्पद! जर्मन नौदलाच्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक खालावली, भारतीय नौदलाकडून तात्काळ मदत
Indian Navy भारतीय नौदलाने मुंबईपासून सुमारे 275 किमी अंतरावर असलेल्या जर्मन नौदल जहाज बायर्नमधून बाहेर काढलेल्या अधिकाऱ्याला त्वरित वैद्यकीय सेवा आणि मदत दिली आहे.
मुंबई : भारतीय नौदलाची (Indian Navy) एक कौतुकास्पद कामगिरी समोर आली आहे. अचानक तब्येत खालावलेल्या जर्मन नौदलाच्या अधिकाऱ्याला भारतीय नौदलाकडून त्वरित वैद्यकीय सेवा आणि मदत पुरवली गेली. भारतीय नौदलाने मुंबईपासून सुमारे 275 किमी अंतरावर असलेल्या जर्मन नौदल जहाज बायर्नमधून बाहेर काढलेल्या अधिकाऱ्याला त्वरित वैद्यकीय सेवा आणि मदत दिली आहे.
जर्मन जहाजावर असलेल्या नौदल अधिकाऱ्याची तब्येत अचानक खालावल्याने भारतीय नौदलाकडून त्या जर्मन अधिकाऱ्याला मदत करून त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
The @indiannavy extended prompt medical care & support to an officer evacuated from German Naval Ship Bayern about 275 km off Mumbai.
— PRO Defence Mumbai (@DefPROMumbai) January 21, 2022
Based on a request from the German Embassy, the patient was landed at #INSShikra by a ship-borne Super Lynx helicopter, coordinated by #WNC. (1/2) pic.twitter.com/XN6NYvkRH7
जर्मन दूतावासाच्या विनंतीच्या आधारे, रुग्णाला वेस्टर्न नेव्हल कमांडद्वारे समन्वयित जहाज-जनित सुपर लिंक्स हेलिकॉप्टरद्वारे आयएनएस शिक्रा येथे उतरवण्यात आले.
On arrival at the naval hospital #INHSAsvini, the officer was attended to by a multidisciplinary team of specialist doctors and underwent several tests. The patient is now stable and under observation. (2/2)
— PRO Defence Mumbai (@DefPROMumbai) January 21, 2022
नौदल रुग्णालय INHS अश्विनी येथे या जर्मन अधिकाऱ्याला आणण्यात आले आहे, अधिकाऱ्याला तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत असून रूग्णाची प्रकृती आता स्थिर असून निरीक्षणाखाली आहे.
दरम्यान, जर्मन नौदलाचे फ्रिगेट बायर्न, F217 आज मुंबईत दाखल झाले. या युद्धनौकेचे भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर आणि महाराष्ट्राचे प्रोटोकॉल, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले.
Maharashtra | German Navy's Frigate Bayern, F217 arrived in Mumbai today
— ANI (@ANI) January 21, 2022
The warship was received by Germany's Ambassador to India Walter J Lindner and Maharashtra's Minister for protocol, Tourism, and Environment Aditya Thackeray pic.twitter.com/Ed2ckeOJKw
.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha