एक्स्प्लोर

Maharashtra Bhushan Award Live Updates: उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra Bhushan Award: ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Bhushan Award Live Updates: उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Background

Maharashtra Bhushan Award: ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Minister Amit Shah)  यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर (Kharghar) येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे.

राज्य शासनाच्यावतीनं देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज (रविवारी) 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केलं आहे.

सकाळी साडे दहाच्या सुमारास हा सोहळा होणार आहे. त्यासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य इत्यादी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री सदस्य त्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजनपूर्वक काम सुरू आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहन तळ, वाहतुक सुरळीत राहण्यासाठीचे नियोजन याकडे लक्ष देण्यात येत आहे.  नागरिकांना रेल्वे स्थानकापासून ते सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सोहळ्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे 250 टॅंकर आणि 2100 नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून 69 रुग्णावाहिका, 350 डॉक्टर्स, 100 नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. 32 फिरते शौचालय, 4200 पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी 9000 तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी 60 जेटींग मशीन, 4000 सफाई कर्मचारी शिवाय 26 अग्निशमन  वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी 22 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी 600 स्वयंसेवक, 200 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

या सोहळ्याचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  दोन वेळेस प्रत्यक्ष भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी  नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुनियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

00:03 AM (IST)  •  17 Apr 2023

उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

17:51 PM (IST)  •  16 Apr 2023

Nashik Shivsena Protest : युवती सेनेच्या वतीने शिवानी वडेट्टीवार यांच्या बॅनरला जोडे मारत निषेध आंदोलन 

Nashik Shivsena Protest : नाशिक जिल्हा युवती सेनेच्या (शिवसेना) वतीने शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. याचा निषेध म्हणून नाशिक मधील शिवसेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर युवती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी युवती कार्यकर्त्यांनी शिवानी वडेट्टीवार यांच्या बॅनरला जोडे मारत निषेध केला. शिवानी वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू असा इशारा युवती सेनेच्या वतीने देण्यात आला.

13:14 PM (IST)  •  16 Apr 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना जाते : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

Appasaheb Dharmadhikari : मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना जात असल्याचे मत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नसल्याचे धर्माधिकारी म्हणाले. आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहीरात करायची गरज काय आहे असे धर्माधिकारी म्हणाले. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. माझा श्वास असेपर्यंत हे कार्य सुरु राहणार आहे. माझ्यानंतर सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करेन असे धर्माधिकारी म्हणाले. काम उत्तम असेल तर सन्मान होतोच असे धर्माधिकारी म्हणाले. हा पुरस्कार नानांच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी आहे. नानासाहेबांनी मोठं कष्ट केल्याचे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.

 

समाजसेवा सर्वात श्रेष्ठ आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मी उभं केलं. त्या मार्फत मी काम केलं. यामध्ये वृक्षारोपण आहे. ते काम करावं हे देखील सांगितले जाते.  प्रत्येकाने पाच पाच झाडे लावावी असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं. माणवाने सदृ्ढ आयुष्य जगावं यासाठी आरोग्य शिबीर आपण घेतो.रक्तदान शिबीर आपण घेतो. रक्त ज्याला गरज आहे त्याला मोठा उपयोग होईल. दुसऱ्याचे जीवन त्यामुलं वाचेल. आपण सेवा म्हणून काम केलं पाहिजे. अखेरच्या श्वासापर्यंत मी समाजसेवंच काम सुरु ठेवणार असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. पाणी असते पण विकत घ्यावे लागते, त्यामुळं आपण पाणपोई उभ्या केल्या आहेत. ठिकठिकाणी आपण बस थांबे तयार करत आहोत. तसेच जलसंधारणाचे काम देखील आपण करत आहोत. पाणी वाचवण्याचे काम आपण केलं पाहिजे असे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. स्वच्छ भारत करण्यासाठी आणखी काम केलं पाहिजे. मानवता धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. पोलिस प्रशासनाचेही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आभार मानले. ज्या ज्या ठिकाणी नुकसान होते, त्या त्या ठिकाणी आम्ही प्रतिष्ठानच्या वतीनं मदत करण्याचे काम करतो. पण आणखी हे काम वाढलं पाहिजे असे आप्पासाहेब म्हणाले.

प्रत्येकाने मन स्वच्छ करावे. मन अस्थिर आहे. कधीच शांत बसत नाही. मन स्थिर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. आशिर्वादावर अवलंबून न राहता प्रत्येकान काम केले पाहिजे. किर्ती सहसा मिळत नाही. समाजसेवेचं काम हे कधीही पूर्ण होणार नाही. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावं असे वाटत असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. सतकिर्ती वाढवावी, अपकिर्ती थांबवावी. किर्ती वाढवण्यासाठी मेहनत करावी लागेल असे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. पुरस्काराचे मिळालेले 25 लाख रुपयांचे मानधन हे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जाहीर केले.  

 

 

12:35 PM (IST)  •  16 Apr 2023

Amit Saha : आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारनं लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे काम केलं : अमित शाह

Amit Saha : जीवनात एवढी गर्दी मी कधीच पाहिली नसल्याचे मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. तुमच्या सर्वांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल किती सन्मान आहे समजत असल्याचे शाह म्हणाले. त्याग, समर्पण आणि सेवेच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी मोठं काम केलं आहे. समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यात राहतो हे मी प्रथमच पाहत आहे. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारने लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे शाह म्हणाले. त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. 

 

योग्य व्यक्तिचा सन्मान केल्याबद्दल मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. 

 

12:21 PM (IST)  •  16 Apr 2023

राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन महाराष्ट्र राज्याचा मान वाढल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. एवढ्या महासागरासमोर काय बोलावं समजत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही तर मी परिवारातील श्री सदस्य म्हणून बोलत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विनंतीला मान देऊन गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. सूर्य आग ओकत असताना एकही माणूस जाघ्यावरुन उठत नाही हे आप्पासाहेबांचे आशिर्वाद आहेत. शिस्तीचे पालन सर्व सदस्य करत आहेत. माझी पत्नी आणि मुलगा श्रीकांत समोर बसला आहे. लहान मोठा कोणी नाही. सगळे सदस्य म्हणून समोर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आप्पासाहेबांची जादू पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी, त्याचे उदाहरण आपण पाहतोय. आजच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड आप्पासाहेबांचे सदस्यच मोडू शकतात. या महासागरामध्ये तुमच्या देव दिसत आहे. 

 

धर्माधिकारी घराणे गेल्या 400 वर्षापासून समाजाची सेवा करत आहे. अज्ञान दूर करण्याचे काम सुरु आहे. भरकटलेल्या कुटुंबाना दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं आहे. लाखो कुटुंबात माझेही एक कुटुंब होते. परिवारा दुखाचा डोंगर कोसळला, त्यावेळी आनंद दिघेंनी आधार दिला. तर आप्पासाहेबांनी समाजाची सेवा करण्याचा मार्ग दाखवला. त्याचे मोठे योगदान मी कधीही विसरु शकणार नाही. लाखो कुटंब वाचवण्याचे काम त्यांनी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुरस्कार देण्यासाठी जे आलेत ते कडवट देशभक्त आहेत. अमित शाह पंतप्रधानांच्या नेतृत्वात 370 कलम रद्द केले तसेच  राम मंदिराचे कामही त्यांच्या नेतृत्वा सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आप्पासाहेबांच्या कार्याची दखल केंद्र सरकारनेगी घेतली. माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे मु पो रेवदंडा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

धर्माधिकारी कुटुंब भरकटलेल्यांना मार्ग दाखवणारे दिपस्तंभ आहे. हा पुरस्कार दिल्यामुळं पुरस्काराची उंची वाढली महाराष्ट्राचा मान सन्मान वाढला. मी मुख्यमंत्री असताना त्यांना पुरस्कार दिला जात आहे यापेक्षी दुसरा कोणताही आनंदाचा क्षण असू शकत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.  

 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget