Maharashtra Bandh Live Updates : काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद
Maharashtra Bandh Live Updates : लखीमपूरमध्ये (Lakhimpur) शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
LIVE

Background
बंदला आमचा संपूर्ण पाठिंबा, लखीमपूरमधील घटना सरकारी दहशतवाद नव्हता का? स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
लखीमपुर-खीरी या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र या बंदला विरोध करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा बंद सरकारी दहशतवाद असल्याची टीका महाविकास आघाडी सरकारवर केली आणि याच टीकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उत्तर देत लखीमपूर या ठिकाणी झालेली घटना ही सरकारी दहशतवाद नव्हता का असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे तर महाविकास आघाडी सरकारचे आणि आमचे काही मतभेद असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी हा बंद मह विकास आघाडी सरकारने पुकारला त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे असे देखील राजू शेट्टी म्हणाले
बुलडाण्यात बंदचं आवाहन करताना महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची
बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून कडकडीत बंद असून जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाजारपेठ बंद ठेवण्याचं आवाहन करत असताना भाजप कार्यकर्ता असलेल्या एका दुकानदाराने आपलं दुकान बंद करण्यास विरोध दर्शविल्याने महाविकास आघाडीतील कार्यक्रर्ते आक्रमक झाले. त्यांनी बळजबरीने दुकान बंद केलं व दुकानदाराला आत कोंडून ठेवलं. पोलीस आल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर प्रचंड घोषणाबाजी देत महाविकास आघाडीतील कार्यकर्ते व भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

शिवसैनिकांनी रोखला घाटकोपर अंधेरी लिंक रोड, मार्गावर वाहतूक कोंडी, घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध
शिवसेना स्टाईलने कोल्हापूर कडकडीत बंद; शहरातून दुचाकी रॅलीने बंदचे आवाहन
महाविकास आघाडीने पुकारलेल्या जिल्हा बंद मध्ये शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शिवसेना स्टाईलने कोल्हापूर कडकडीत बंद करण्यात आला. शेतकरी हत्येचा निषेध नोंदवत शहरातून भव्य दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज