Maharashtra Bandh Live : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात
Maharashtra Bandh Today Live : महाराष्ट्र बंदची प्रत्येक घडामोड, अपडेट्स वाचा एका क्लिकवर
LIVE
Background
मुंबई : बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना (Badlapur Minor Abuse) समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) सरकारविरोधात आज महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जाणार आहे.
आज बारामतीतही महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती बांंधून आंदोलन
बारामती : आज महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील भिगवण चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळया फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी आंदोलकांनी तोंडाला काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध केला
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात
भर पावसात आंदोलनाला सुरुवात झाली
Nagpur : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नागपुरात काँग्रेसकडून बाईक रॅली
नागपूर -
- बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसने काढली बाईक रॅली
- काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात नागपुरात शहरात कढण्यात आली बाईक-स्कुटर रॅली
- बदलापूर घटनेतील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी
- सोबतच घटनेसाठी जबाबदार असलेल्या इतरांवरही कारवाई करण्याची रॅलीच्या माध्यमातून मागणी
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यलयाबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यलयाबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन केले जाणार
पाऊस सुरू असल्याने भर पावसात होणार आंदोलन
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ होणार आंदोलन
Thane Protest : नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांचे ठाण्यात मूक आंदोलन
बदलापूर घटनेचा निषेध म्हणून थोड्याच वेळात ठाण्यातील तलावपाली परिसारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, विक्रांत चव्हाण आणि इतर राजकीय नेते मूक आंदोलन करतील.