औरंगाबादमध्ये लशीचा एकही डोस न घेतलेले विद्यार्थी-प्राध्यापकाची दर आठवड्याला RTPCR, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
महाविद्यालयात सुरू झाल्याने गर्दी वाढते आहे. विद्यार्थी एकमेकांच्या जवळ बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दोन्ही डोस घेतले तरी दरमहा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हे नवे आदेश दिले आहेत. तर, एक डोस घेतलेल्यांना दोन आठवड्यांनी तर एकही डोस न घेणाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. नव्या कठोर नियमामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. महाविद्यालयात सुरू झाल्याने गर्दी वाढते आहे. विद्यार्थी एकमेकांच्या जवळ बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर वेळप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा, जिल्ह्यातील जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत परंतु त्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा, अन्यथा शासकीय पर्याय वापरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.
आता शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहेत, त्यामुळे महाविद्यालय, खाजगी क्लासेसमधील ज्या शिक्षकांनी कोविडच्या दोन्ही लसी घेतलेल्या आहेत, त्या शिक्षकांनी महिन्यातून एकदा आणि ज्यांनी लस घेतलेली नाही अशा शिक्षकांनी प्रत्येक आठवड्याला कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे.
औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील शाळा उघडण्याचा निर्णय देखील लांबणीवर पडलाय. पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतर घेऊ, असं पालिका आयुक्त अस्तिककुमार यांनी सांगितलंय. 15 डिसेंबरपर्यंत कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिलीय.
Aurangabad : एकही डोस न घेतलेले विद्यार्थी, प्राध्यापक यांना दर आठवड्याला RTPCR चाचणीची सक्ती
इतर महत्त्वाच्या बातम्या :
शाळा, महाविद्यालयांना मान्यता देण्यापूर्वी डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या शिफारशी लागू करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश