(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून तीन पक्षात महानगरपालिकेत फूट होईल का याची ही चर्चा सध्या सुरू आहे.
Aurangabad To Sambhajinagar : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणार असं शिवसेना वारंवार सांगत आहे. मात्र शिवसेना महाराष्ट्रात ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत सत्तेत आहेत ते मात्र काहीही झालं तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर होऊ देणार नाही असं म्हणतात. त्यामुळे शिवसेना खरोखरच महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचा नामांतर करण्यात यशस्वी होणार का याची चर्चा सध्या रंगत आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद देत शिवसेना सुपर संभाजीनगर, ध्वज दिवाळी असे कार्यक्रम करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोबत जरी गेलो असलो तरी हिंदुत्व सोडलं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र शिवसेना ज्यांच्या सोबत महाराष्ट्रात सत्तेत आहे ते मात्र शिवसेना हिंदुत्ववादी असली तरी त्यांचे हिंदुत्ववादी मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असं वारंवार सांगते आहे.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे शिवसेनेचे स्वप्न आहे. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असा दावा काँग्रेस राष्ट्रवादीकडून केला जात आहे. शिवसेनेने मध्यंतरी सरकारी स्तरावर नामांतराचा प्रयत्न केला, विभागीय आयुक्तांनी तसा अहवालही पाठवला. शिवसेनेच्या मंत्र्यांकडून शासकीय कागदपत्रावरही संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे की, आता ती वेळ आली आहे असं म्हटलं. पण त्यांच्या सोबत सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस मात्र शिवसेनेला वेळ साधू देणार नाहीत हेच यावरून दिसत आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महानगरपालिकेच्या निवडणुका लढवतील असे म्हटले जात आहे. मात्र गेल्या पंचवीस वर्षात शिवसेना संभाजीनगरचा मुद्दा अस्मितेचा केला आहे . याच मुद्द्यावरून जर वाद सुरू झाला तर हे तीन पक्ष एकत्र लढतील काय यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून तीन पक्षात महानगरपालिकेत फूट होईल का याची ही चर्चा सध्या सुरू आहे.
औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास काय?
या शहराचं नावाजलेलं नाव म्हणजे खडकी, हा परिसर बेसाल्ट खडकावर वसलेला आहे त्यात शहरात अगदी प्राचिन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे असं इतिहासात नोंद आहे. त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता ख-या अर्थानं नहरे ए अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्यानं या गावाचं शहर केलं मात्र त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही, कालांतरानं 1633मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव फतेहनगर असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला त्यानं पुन्हा या शहराचं नाव फतेहनगर वरून खुजिस्ता बुनियाद असे ठेवले, कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :