विना मास्क फिरला तर मिळणार e-challan; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, आतापर्यंत 300 हून अधिक लोकांवर कारवाई
Aurangabad : औरंगाबाद शहरात विनामास्क प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे.
औरंगाबाद : कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आता औरंगाबाद शहरात विनामास्क प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. आतापर्यंत 300 जणांना औरंगाबादमध्ये ऑनलाईन दंड भरावा लागलाय. लसीकरण वाढवण्यासाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी अत्यावश्यक वस्तू म्हणजे किराणा, स्वस्तधान्य, पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तू या लसीकरणाचा पहिला डोस घेतल्या शिवाय मिळणार नाहीत असा निर्णय घेतला. या निर्णयानंतर औरंगाबाद जिल्यात रोज 10 हजार लस वाढल्याचा दावा जिल्हाधिकारी यांनी आहे. लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठीच्या औरंगाबाद पॅटर्नचं सुरुवातीला कौतुक झालं. पण सातत्यानं नियमांचा भडिमार होत असल्यानं दोघांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाच्या सर्टिफिकेटची सक्ती करू लागले, तसा लसीकरणाचा प्रमाणपत्र बनवण्याच्या टोळ्या समोर आल्या. औरंगाबाद शहर पोलिसांनी आत्तापर्यंत दोन टोळ्या गजाआड केल्या आहेत. या लोकांनी कित्येक लोकांना बनावट सर्टिफिकेट दिली आहेत आणि ते बाजारात फिरत आहेत. कारण ही सर्टिफिकेट खरी का खोटी हे तपासण्याची कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही. कोरोनाच्या संकटात लसीकरणाचा टक्का वाढलाच पाहिजे कुणाचं दुमत नाही. पण प्रत्येकच गोष्टीसाठी सक्ती करणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे. आता न्यायालय यावर काय भूमिका घेतं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी
- कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनंतर ओमायक्रॉनला कशी मात द्याल?, अदर पुनावालांनी भन्नाट पोस्ट करत दिली माहिती
- Coronavirus Cases Today : देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका! तर कोरोनाच्या 7 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद