एक्स्प्लोर
Advertisement
पीए लाचखोरीनंतर दाऊद कॉलप्रकरणातही खडसेंना क्लीन चिट
मुंबई : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यात फोनवरुन कोणतंही संभाषण झालं नाही, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसने हायकोर्टात दिली आहे.
एटीएसच्या अहवालामुळे आता एकनाथ खडसे या प्रकरणातही निर्दोष सुटण्याची चिन्हं आहेत. एटीएस तपास अहवाल सायबर सेलकडे सोपवणार आहे.
यापूर्वी कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी एसीबीने मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात एकनाथ खडसेंचं नाव नाही.
दरम्यान, आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांनी 4 जून रोजी मंत्रिपदाची राजीनामा दिला होता. खडसेंनी त्यांच्याकडील महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मत्स्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली होती.
संबंधित बातम्या
पीए लाचखोरीप्रकरणात खडसेंना क्लीन चीट
गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक
जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे
खडसे, महाजनांवरील आरोप खोटे : मुख्यमंत्री
अखेर एकनाथ खडसेंचा राजीनामा, सर्व मंत्रिपदं सोडली
एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना
गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement