एक्स्प्लोर

Maharashtra : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींची पुरवणी मागणी, लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटींचा निधी

Maharashtra Assembly Session : लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी 1400 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे. 

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत 35 हजार 788 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 1400 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. तर मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. राजकोटवरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 36 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.  राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागणी मांडली. 

विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्यांत निधीची तरतूद

  • सहकारी आणि खाजगी दूध संघांना प्रती लिटर 5 आणि 7 रुपये अनुदान यासाठी 758 कोटी रुपये.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजना यासाठी राज्याचा हिसा म्हणून 814 कोटी रुपये तरतूद.
  • मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 2 हजार 750 कोटींची तरतूद.
  • यंत्रमाग वस्त्रोद्योग विज सवलतीसाठी 300 कोटी रुपये.
  • सरपंच वाढीव मानधन यासाठी 128 कोटी.
  • सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसीठी 890 कोटी रुपयांची तरतूद. 
  • अदिवासी विकास विभागाला 1813 कोटी रुपये  तरतूद. 
  • लाडकी बहिण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद करण्यात आली आहे. 
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 290 कोटी रुपयांची तरतूद. 
  • ओबीसी समाजासाठी मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी रुपयांची तरतूद.
  • मुंबई मेट्रो तीनसाठी 655 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद.
  • राज्यातील रस्ते व पुलासाठी 1500 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद.
  • इमारती, रस्ते, पुल  बिनव्याजी कर्जातून बांधण्यासाठी 3195 कोटी रुपयांची तरतूद. 
  • राजयातील वैधकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी 1170 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद. 
  • सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन देण्यासाठी 1204 कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची तरतूद.
  • राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपयांची अतिरीक्त तरतूद. 

लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद

लाडक्या बहिणींसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ही तरतूद  करण्यात आली आहे. मात्र, मासिक लाभ 1500 वरुन 2100 करण्याची अजूनही तरतूद करण्यात आली नाही. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं मला देणं घेणं नाही, भुजबळांवर भाष्य टाळलंPrakash Ambedkar Full PC : सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला मी थांबणार : प्रकाश आंबेडकरAshok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असताRajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
Embed widget