Maharashtra Winter Session Live Updates: संजय राऊत शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
Maharashtra Assembly Winter Session: आज विधीमंडळ अधिवेशनात सीमा प्रश्नी ठराव सादर होण्याची शक्यता आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर...
LIVE
Background
Maharashtra Winter Session Live: नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आजचा सातवा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तर, सत्ताधारी आमदारांनी विरोधकांविरोधात आंदोलन करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. सोमवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर, दुसरीकडे आज सरकारकडून सीमा प्रश्नावर ठराव येण्याची शक्यता आहे.
सीमा प्रश्नी विधीमंडळात ठराव
कर्नाटकने त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधी ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. याबाबत विरोधी पक्षाकडून सोमवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात कर्नाटक सरकारविरोधात ठराव आणण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या सरकारने हा ठराव मंगळवारी सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
कर्नाटकच्या विधीमंडळात 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्रच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला. महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकाच्या विधिमंडळात मांडला होता.
अब्दुल सत्तार काय उत्तर देणार?
अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल (26 डिसेंबर) सभागृहात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसह (Ajit Pawar) विरोधकांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपाला आज अब्दुल सत्तार हे सभागृहात उत्तर देणार आहेत.
यरान जमीन घोटाळाप्रकरणी सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. त्याशिवाय, विरोधकांनी सिल्लोड कृषी महोत्सवाची तिकीट विकण्यासाठी सत्तारांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला असल्याचा आरोप केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 'वसुली भाई....सत्तार भाई' अशी घोषणाबाजी केली.
भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे आली एकत्र, सहकारी संस्थांच्या निवडणूक बिनविरोध
राज्याच्या राजकारणात भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे एकमेकांच्या विरोधात मैदानात असतात. मात्र, बारामती तालुक्यातल्या एका सहकारी संस्थांच्या निवडणूकीत तीनही पक्षांची दिलजमाई झाली आहे. या संस्थेच्या निवडणुकीत तीनही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून निवडणूक बिनविरोध केलीय.
Maharashtra Assembly Winter Session : संजय राऊत शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
राज्यात कोणत्याच महापुरुषांचा अपमान होणे योग्य नाही. महापुरुषांचा अपमान होऊ नये यासाठी एक विधेयक आणण्याची मागणी काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसं पत्र देखील दिलं आहे. विरोधकांकडून काही जणांनी मागणी केली की उदयनराजे खरचं शिवजी महाराज यांचे वंशज आहेत का याचे पुरावे द्या. असेच एक महिला नेत्या म्हणाल्या की संजय राऊत यांच्या मातोश्री मा जिजाऊ सारख्या आहेत आणि त्यांनी संजय राऊत यांना शिवाजी महाराज म्हणाल्या आहेत. आता त्यांची तुलना तुम्ही शिवाजी महाराज यांच्याशी करणार का? राहुल गांधी सावरकरांना माफीवीर म्हणतात. संजय राऊत शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात, त्यावेळी कोणी काहीच बोलत नाहीत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केलाय.
Maharashtra Assembly Winter Session: अमोल मिटकरी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली समज, पंतप्रधानांबाबत बोलणं अयोग्य
Maharashtra Assembly Winter Session: अमोल मिटकरी तुमचं वागणं योग्य नाही. एकनाथ खडसे तुम्ही जेष्ठ सदस्य आहात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबाबत बोललात आम्ही काही बोलत नाही. पण पंतप्रधान यांच्याबाबत बोलणं सहन करणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिटकरी यांना समज दिली.
Maharashtra Winter Session Live: पंढरपूर विकासाच्या मुद्यावर विधान परिषदेत लक्षवेधीवर चर्चा
Maharashtra Winter Session Live: पंढरपूर विकासाच्या मुद्यावर विधान परिषदेत लक्षवेधीवर चर्चा सुरू आहे.
विधान परिषदेत अमोल मिटकरी यांनी वाचून दाखवलेल्या ट्वीटवरून गदारोळ, सभागृहाचे कामकाज स्थगित
Maharashtra Winter Session: विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुब्रम्हण्यम स्वामी यांचं एक ट्विट वाचून दाखवलं त्यावरून जोरदार गोंधळ झाला. त्या ट्विट मध्ये नरेंद्र मोदी यांचा रावण उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला.