एक्स्प्लोर

Assembly special session: 280 आमदारांचा शपथविधी आटोपला, पण 8 जण आलेच नाहीत, समोर आलं महत्त्वाचं कारण

Maharashtra Assembly special session: काल आणि आज 280 आमदारांचा शपथविधी पार पडला, पण 8 आमदार अधिवशनाला आले नाहीत, त्यातील काही आमदारांच्या अनुपस्थितीचं कारण समोर आलं आहे.

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुती सरकार सत्तेत आलं, त्यानंतर काल(शनिवार)पासून विशेष अधिवशन बोलावण्यात आलं आहे. काल आणि आज (शनिवारी आणि रविवारी) नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पडला. काल शपथविधीवरती महाविकास आघाडीसह विरोधी आमदारांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला होता. 288पैकी राहिलेल्या विरोधी आमदारांनी आज (ता.8) शपथ घेतली. काल आणि आज 280 आमदारांचा शपथविधी पार पडला, पण 8 आमदार अधिवशनाला आले नाहीत, त्यातील काही आमदारांच्या अनुपस्थितीचं कारण समोर आलं आहे. (Maharashtra Assembly special session) 

आज 114 पैकी 106 आमदारांनी शपथ घेतली आहे. अद्याप 8 आमदारांचा शपथविधी बाकी आहे, शपथविधी सोहळ्यात 8 आमदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके हे आमदार अनुपस्थित असल्याची माहिती आहे. उद्या उर्वरित काही आमदार शपथ घेणार असल्याची माहिती आहे.  याउलट काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ घेतील. शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित होते. (Maharashtra Assembly special session) 

 शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित

 आजच्या शपथविधीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित होते. वरूण सरदेसाई आणि  मनोज जामसुतकर हे आमदार गैरहजर होते. वरूण सरदेसाई यांचा पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे मुंबई बाहेर असल्या कारणाने शपथ घेऊ शकले नाहीत तर मनोज जामसुतकर यांची तब्येत ठीक नसल्याने आणि रुग्णालयात उपचार घेत असल्याने शपथ घेऊ शकले नाहीत अशी माहिती समोर आली आहे. (Maharashtra Assembly special session) 

तर आमदार शेखर निकम यांचा मुलगा ऑस्ट्रेलियाला शिक्षण घेतो. त्याच्या कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम आहे. त्यासाठी पालक उपस्थित असणं गरजेचं आहे. त्यामुळे निकम हे ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. यापूर्वी मुलाच्या कॉन्व्होकेशनला दोन ते तीन वेळा ते गैरहजर राहिले होते. पण यावेळी मात्र ते आवर्जून उपस्थित आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही.(Maharashtra Assembly special session) 

विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली. यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव पुकारले असता सर्व आमदार बाहेर पडले. तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या आमदारांनी शपथ न घेता कामकाजावर बहिष्कार टाकला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget