Uddhav Thackeray : काल जे घडलं ते लाजिरवाणं होतं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अधिवेशनात जे काही झाले ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे.
मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला काल सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाचा पाहिलाच दिवस वादळी ठरला. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं आहे. दरम्यान या सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. 'काल जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं.', असे म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, काल जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेलं आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे.
वेडवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचा. हे करायचे असेल तर रस्त्यावर करु शकता. मात्र, सभागृहामध्ये माईक असतात. माईक ओढायचे हे काही आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षणं नाही. भास्करराव यांच्या दालनात जे काही घडलं त्यातील बरचसं वर्तन त्यांनी केलं. ते ऐकल्यानंतर सिसारी यावं असं हे वर्तन आहे. हा देशात तसेच राज्यात पायंडा पाडयाला नको आहे. त्यासाठी प्रत्येकांना आपली मर्यादा काय आहे, हे समजून घ्यायला हवे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
बोगस लसीकरण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार : उद्धव ठाकरे
बोगस लसीकरण ज्यांनी केलं त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार. तसेच ज्यांना बोगस लस दिली त्यांचं पुन्हा लसीकरण केलं जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सभागृहात सरकारविरोधात दिलेल्या घोषणा लांछनास्पद : मुख्यमंत्री
काल सभागृहात जे घडलं त्यामुळे मी दु:खी आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु भास्कर जाधव यांच्या दालनाता त्यांच्या सोबत काय झाले हे ऐकून आपण ही या घटनेचा निषेध कराल. एखाद्या जबाबदार पक्षाच्या वतीने असे वागणे ठीक नाही. हे वर्तन महाराष्ट्रात घडू शकतं यावर माझा काय कुणाचाच विश्वास बसणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ : मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, सध्या कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक घेणे शक्य झाले नाही. परंतु कोरोना परिस्थिती आटोक्यात येईल तेव्हा निवडणूक घेऊ. या संदर्भात मी राज्यपालांना देखील कळवलं आहे