एक्स्प्लोर
Advertisement
पुन्हा महायुतीचं सरकार येणार, प्रमुख वृत्तवाहिन्यांचा 3 वाजेपर्यंतच्या मतदानानुसार एक्झिट पोलचा अंदाज
दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा पोल ऑफ पोल हाती आला आहे. यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार प्रमुख वृत्तवाहिन्यांनी आपला अंदाज वक्त केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 54.53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार एबीपी माझा सी वोटरसह देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीच्या निकालाचा सर्व्हे केला. या सर्वच वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा पोल ऑफ पोल हाती आला आहे. यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार प्रमुख वृत्तवाहिन्यांनी आपला अंदाज वक्त केला आहे. यामध्ये टाईम्स नाऊच्या पोलनुसार महायुतीला 230 तर महाआघाडीला केवळ 48 जागा येतील, तर अन्य पक्षांना 10 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. न्यूज 18 च्या अंदाजानुसार महायुतीला 243, महाआघाडीला 41, तर अन्य पक्षांना चार जागा मिळतील असे म्हटले आहे. तर इंडिया टुडेनुसार महायुतीला 180 आणि महाआघाडीला 81 जागा आणि इतर पक्षांना 27 जागा मिळतील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रिपब्लिकच्या अंदाजानुसार 223 जागा महायुतीला तर 54 जागा महाआघाडीला मिळतील तर इतर पक्षांना 11 जागा मिळतील असा अंदाज आहे.
वाहिन्या महायुती महाआघाडी इतर
टाइम्स नाऊ 230 48 10
इंडिया टुडे 180 81 27
न्यूज 18 243 41 04
रिपब्लिक 223 54 11
टीव्ही 9 197 75 16
एबीपी माझा 204 69 15
एबीपी माझा - सी वोटरचा अंदाज : महायुतीला 204, महाआघाडीला 69 जागा, 3 वाजेपर्यंतच्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज
एबीपी माझा सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती 204 (192 ते 216) जागा जिंकण्याची शक्यता आहे. महाआघाडीला 69 (55 ते 81) जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर इतर पक्ष आणि अपक्षांना 15 (4 ते 21)मिळतील.
विभागनिहाय आकडेवारी (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार)
1. मुंबईतल्या एकूण 36 जागांपैकी महायुतीला 31, महाआघाडीला 4 तर जागा मिळतील. एक जागा इतरांना मिळेल.
2. कोकण विभागातील एकूण 39 जागांपैकी 32 जागांवर महायुती जिंकेल, 5 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना दोन जागा मिळतील.
3. मराठवाडा विभागातील एकूण 46 जागांपैकी 26 जागा महायुतीला मिळतील, तर 14 जागांवर महाआघाडी विजय मिळेल, इतरांना 6 जागा मिळतील.
4. उत्तर महाराष्ट्र विभागातील एकूण 35 जागांपैकी 23 जागांवर महायुती जिंकेल, 12 जागा महाआघाडीला मिळतील. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
5. विदर्भातील एकूण 62 जागांपैकी 50 जागांवर महायुती जिंकेल, 9 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 3 जागा मिळतील.
6. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 70 जागांपैकी 42 जागांवर महायुती जिंकेल, 25 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 3 जागा मिळतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement