Sadabhau Khot : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मायबाप सरकारनं तात्काळ मदत करावी, अन्यथा.....सदाभाऊ खोतांचा इशारा
Sadabhau Khot : पावसामुळं आणि गारपिटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मायबाप सरकारनं तात्काळ मदतीची घोषणा करावी, असे निवेदन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
Sadabhau Khot : अवकाळी पावसामुळं (Unseasonal rains) राज्यातील 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28 हजार हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त झाली. या नुकसानीमुळं राज्यात सामूहिक आत्महत्या देखील होत आहेत, हे खरंच दुर्दैवी असल्याचे मत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी व्यक्त केलं आहे. पावसामुळं आणि गारपिटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मायबाप सरकारनं तात्काळ मदतीची घोषणा करावी, असे निवेदन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना जर सरकारकडून मदत मिळाली नाही तर रयत क्रांती संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही खोतांनी दिला आहे.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पिकं पाण्यात वाहून गेलं आहे. या अवकाळीच्या संकटामुळं शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे. त्यामुळं आता अवकाळी पावसामुळं होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित केले जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. परंतु राज्यावरील अवकाळीचं संकट काही केल्या कमी होत नसल्याचे खोत म्हणाले.
तातडीने पंचनामे करावेत
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं फळबागांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसा झालं आहे. यामुळं राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत असल्याचे खोत म्हणाले. त्यामुळं सरकारनं तातडीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं मदत द्यावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. अनेक जिल्ह्यात आत्महत्येच सत्र सुरु आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये अशी विनंती करत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. शेतकऱ्यांना जर सरकारकडून मदत मिळाली नाही तर रयत क्रांती संघटना खांद्याला खांदा लावून लढेल असे खोत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: