Nashik Rain : नाशिकमध्ये अवकाळीचा कांद्याला फटका, बाजारात विक्री होत नसल्यानं शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ
शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा (Onion) अवकाळी पावसामुळं भिजल्यानं आहे. त्यामुळं बाजार समितीत तो कांदा विकला जात नाही. त्यामुळं या कांद्यावर शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय.
Nashik Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rain) थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा (Onion) या पावसामुळं भिजल्यानं बाजार समितीत विकला जात नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी या कांद्यावर चरायला शेळ्या-मेंढ्या सोडल्या आहेत.
Unseasonal rain : गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा या पावसामुळं भिजला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. भिजलेल्या कांद्याची सध्या बाजारात विक्री होत नसल्यानं त्या कांद्यावर शेळ्या-मेंढ्या सोडायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. अद्यापही काही ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. यामुळं कांद्यासह अन्य पिकांचे देखील मोठं नुकसान झालं आहे.
IMD : आजपासून पुढचे पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचे दिसत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात (Marathwada) पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
13 ते 15 एप्रिल दरम्यान गारपीट होण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र विदर्भात कुठेही गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली नाही. पुन्हा अवकाळीचा इशारा दिल्यानं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: