एक्स्प्लोर

निवडणुकांची रणधुमाळी आजपासून, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई : राज्यातील निवडणुकांची खरी रणधुमाळी आजपासून सुरु होणार आहे. 10 महापालिका, 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 4 फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार आहे. सात फेब्रुवारीला अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असेल. राज्यातल्या 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून 23 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. तर 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 16 फेब्रुवारीला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून यात 15 जिल्ह्यांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून महापालिकांसोबतच जिल्हा परिषदांचा निकाल 23 फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद पहिला टप्पा - (16 फेब्रुवारीला मतदान, निकाल 23 फेब्रुवारी) औरंगाबाद, जालना, परभणी,  हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली ( दोन टप्प्यात) जिल्हा परिषद दुसरा टप्पा - (21 फेब्रुवारीला मतदान, निकाल 23 फेब्रुवारी) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम तपशील पहिला टप्पा (15 जि. प. व 165 पं.स.) दुसरा टप्पा (11 जि. प. व 118 पं.स.)
नामनिर्देशनपत्र सादर करणे 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2017 1 ते 6 फेब्रुवारी 2017
नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 फेब्रुवारी 2017 7 फेब्रुवारी 2017
जिल्हा न्यायाधीशांकडे अपील 5 फेब्रुवारी 2017 10 फेब्रुवारी 2017
निकालाची संभाव्य अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2017 13 फेब्रुवारी 2017
अपील नसल्यास उमेदवारीची माघार 7 फेब्रुवारी 2017 13 फेब्रुवारी 2017
अपील असल्यास उमेदवारीची माघार 10 फेब्रुवारी 2017 15 फेब्रुवारी 2017
मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी करणे 10 फेब्रुवारी 2017 15 फेब्रुवारी 2017
मतदानाचा दिनांक 16 फेब्रुवारी 2017 21 फेब्रुवारी 2017
मतमोजणीचा दिनांक 23 फेब्रुवारी 2017 23 फेब्रुवारी 2017
 

     महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम

तपशील दिनांक
नामनिर्देशनपत्र सादर करणे 27 जानेवारी  ते 3 फेब्रुवारी 2017
नामनिर्देशनपत्रांची छाननी 4 फेब्रुवारी 2017
उमेदवारी माघारीची मुदत 7 फेब्रुवारी 2017
निवडणूक चिन्ह वाटप 8 फेब्रुवारी 2017
मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी 8 फेब्रुवारी 2017
मतदानाचा दिनांक 21 फेब्रुवारी 2017
मतमोजणीचा दिनांक 23 फेब्रुवारी 2017
  दहा महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपसोबत युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात केली.

दहा महानगरपालिकेतले सध्याचे पक्षीय बलाबल

1) मुंबई – एकूण सदस्य संख्या – 227 सत्ता – शिवसेना-भाजप युती शिवसेना – 75 भाजप – 31 काँग्रेस – 52 राष्ट्रवादी काँग्रेस – 13 मनसे – 28 समाजवादी पार्टी – 9 अखिल भारतीय सेना – 2 भारिप – 1 रिपाइं – 1 अपक्ष – 15 2) ठाणे – एकूण सदस्य संख्या – 130 सत्ता – शिवसेना-भाजप युती यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग, त्यानुसार एकूण 33 प्रभाग असतील म्हणजेच 131 सदस्य निवडून येतील. शिवसेना – 57 भाजप – 8 काँग्रेस – 13 राष्ट्रवादी – 30 मनसे – 7 अपक्ष – 15 3) उल्हासनगर – एकूण सदस्य संख्या – 78 सत्ता – शिवसेना-भाजप युती यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 78 सदस्य निवडून येतील. (2 प्रभागात 3 उमेदवार) शिवसेना – 20 भाजप – 11 आरपीआय – 4 साई – 7 बसपा – 2 राष्ट्रवादी काँग्रेस – 8 काँग्रेस – 20 अपक्ष – 6 4) पुणे – एकूण सदस्य संख्या -156 सत्ता – राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 41 प्रभाग असतील म्हणजेच 162 सदस्य निवडून येतील. राष्ट्रवादी – 54 काँग्रेस – 29 मनसे – 28 शिवसेना – 15 भाजप – 26 आरपीआय – 2 5) पिंपरी – एकूण सदस्य संख्या – 128 सत्ता – राष्ट्रवादी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 32 प्रभाग असतील म्हणजेच 128 सदस्य निवडून येतील. राष्ट्रवादी – 83 शिवसेना – 15 काँग्रेस – 13 मनसे – 4 भाजपा – 3 आरपीआय – 1 अपक्ष – 9 6) सोलापूर – एकूण सदस्य संख्या – 102 सत्ता – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 26 प्रभाग असतील म्हणजेच 102 सदस्य निवडून येतील. (24 आणि 3 सदस्यांचे दोन प्रभाग) काँग्रेस – 44 राष्ट्रवादी – 14 भाजप – 26 शिवसेना – 10 बसपा – 3 माकपा – 3 आरपीआय – 1 अपक्ष – 1 7) नाशिक – एकूण सदस्य संख्या – 122 सत्ता – मनसे-अपक्ष-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 31 प्रभाग असतील म्हणजेच 122 सदस्य निवडून येतील. (29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय असणार) मनसे – 39 शिवसेना-रिपाइं – 22 काँग्रेस – 16 भाजपा – 14 राष्ट्रवादी – 20 माकप – 3 अपक्ष – 6 जनराज्य – 2 8) नागपूर – एकूण सदस्य संख्या – 145 सत्ता – भाजप यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 38 प्रभाग असतील म्हणजेच 151 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.)भाजप – 63 काँग्रेस – 41 शिवसेना – 6 राष्ट्रवादी – 6 बसपा – 12 मनसे – 2 मुस्लीम लीग – 2 अपक्ष – 13 9) अकोला – एकूण सदस्य संख्या – 73 सत्ता – सेना-भाजप युती यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 80 सदस्य निवडून येतील. भाजप – 18 काँग्रेस – 18 शिवसेना – 8 भारिप-बमसं – 8 राष्ट्रवादी – 5 शहर सुधार समिती – 3 यूडीएफ – 2 समाजवादी पक्ष – 1 मनसे – 1 अपक्ष – 9 10) अमरावती – एकूण सदस्य संख्या – 87 सत्ता – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 21 प्रभाग असतील म्हणजेच 87 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.) भाजप – 7 शिवसेना – 11 राष्ट्रवादी – 18 काँग्रेस – 25 बसपा – 6 जनविकास काँग्रेस – 6 जनविकास आघाडी – 7 आरपीआय (अ) – 2 आरपीआय (ग) – 1 इतर – 4
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porshe Car Accident Accused Rap Song : जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅपCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्दShrikant Shinde on Dombivali Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, श्रीकांत शिंदे घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget