(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्य शरद पवार चालवत आहेत, ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल सिल्वर ओककडे - महादेव जानकर
आता पवार साहेबांनी पुढाकार घेत धनगर , मराठा अरक्षणासोबत वीज बिल माफी आणि शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत
पंढरपूर : ठाकरे सरकारवर सत्तेत आल्यापासूनच निशाणा साधणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. त्यातच सरकार स्थापनेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका पाहता ही बाबही अनेकांच्याच नजरेत आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही सध्या अशाच आशयाचं एक वक्तव्य करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल आता मातोश्रीवर नसून तो सिल्वर ओककडे गेला आहे आणि हे सरकार शरद पवार चालवत आहेत असा घणाघात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. मंगळवारी पंढरपूरमध्ये पक्षाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिलेले एक हजार कोटींची निधी ठाकरे सरकारने द्यावेत, मराठा आणि धनगर आरक्षणांच्या प्रश्नावर कोर्टाचा खर्च ठाकरे सरकारने उचलावा अशी मागणी त्यांनी केली.
सध्या ओबीसींच्या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असून मराठा आणि ओबीसी तरुणांनी न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी तोपर्यंत डोकी थंड ठेवा असं आवाहनही जानकरांनी केलं. दरम्यान, यावेळी त्यांच्या वक्तव्यातून भाजपवरील नाराजीही व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. जिथं भाजपनं वीज बिल आंदलनातून माघार घेतली पण. किती दिवस भाजपच्याच पाठीवर बसू जायचं, कारण आपला पक्षही एक राष्ट्रीय पक्ष आहे त्याचंही अस्तित्व आहे असं म्हणत भाजपपासून अंतर ठेवण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
लग्न ठरत नाही म्हणून नैराश्यातून व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या
एकिकडे महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधत आणि दुसरीकडे भाजपवरील नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त करत जानकरांनी सर्वांचंच लक्ष वेधलं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.