एक्स्प्लोर

निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव नव्हे, विनंती केली, जानकरांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणल्याच्या प्रकरणावर राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. एका पत्रकारद्वारे त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका जाहीर मांडली आहे. "मी निवडणुक आयोगावर कुठलाही दबाव आणलेला नाही. उमेदवार मोटवाणी ह्यांनी मला विनंती केली की मला कॉँग्रेस कडून निवडणूक लढवायची नसून मला अपक्ष म्हणून आपल्या कपबशी हया चिन्हावर लढायचे आहे. तेव्हा मी फक्त निवडणुक निर्णय अधिकारी यांना विनंती केली. माझा निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर पूर्ण विश्वास असून ते निर्णय घेण्यास समर्थ आहेत.", असे महादेव जानकर यांनी स्पष्टीकरण दिले. जानकर यांचं स्पष्टीकरण जसंच्या तसं : "मी कुठल्याही प्रस्थापित राजकीय कुटुंबातून आलेलो नाही. मी स्वत:ला झिजवत स्वकतृत्वातून वर आलेला सामान्य कार्यकर्ता आहे. जो सामान्य माणसाच्या हक्कासाठी समर्पित आहे. मला फक्त राजकीय डावपेच कळत नाही. तरीही मी निवडणूक आयोगावर कुठलाही दबाव आणलेला नाही. उमेदवार श्री. मोटवाणी ह्यांनी मला विनंती केली की मला कॉँग्रेसकडून निवडणूक लढवायची नसून मला अपक्ष म्हणून आपल्या कपबशी हया चिन्हावर लढायचे आहे. तेव्हा मी फक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती केली. माझा निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर पूर्ण विश्वास असून ते निर्णय घेण्यास समर्थ आहेत." निवडणूक आयोगाच्या नोटिशीनंतर जानकरांचं स्पष्टीकरण देसाईगंज नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेलं वृत्त आणि काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीनंतर नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर अखेर महादेव जानकर यांनी स्पष्टीकरण दिले. काय आहे प्रकरण? महादेव जानकर यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जानकर प्रशाकीय अधिकाऱ्याला विरोधकांचे अर्ज बाद करण्याचा सल्ला देत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी येत्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचा अर्ज आल्यास तो बाद करा, असंही जानकर बोलल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Video: अर्ध आयुष्य काँग्रेसच्या वैरात गेलं, बाळासाहेबांनी भाजपसाठी सोसलं, तडीपारला वाचवला, पण काँग्रेसने मातोश्रीकडे हावरटासारखं बघितलं नाही, शब्दाला जागली, भाजप संपवायला निघाली; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार

Uddhav Thackeray: मला नेतृत्त्वाची हाव नाही, आरोप होत असतील तर शिवसेना पक्षप्रमुखद सोडायला मी तयार; उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाने खळबळ
मला नेतृत्त्वाची हाव नाही, आरोप होत असतील तर शिवसेना पक्षप्रमुखद सोडायला मी तयार; उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाने खळबळ
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'

राऊत तुमचं तोंड सांभाळा, हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून पाहा, रामदास कदमांचा थेट इशारा
राऊत तुमचं तोंड सांभाळा, हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून पाहा, रामदास कदमांचा थेट इशारा

व्हिडीओ

Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : भाजप म्हणते कोणाचंही बटन दाबा, माणूस आमच्याकडेच येणार, आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : देशाला आणि आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Iran War Live Update: युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
Share Market : शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी, सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?
शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी, सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?
Rohit Sharma: टीम इंडियाच्या हिटमॅन पर्वाचा उद्या अस्त होणार? रोहित कारकिर्दीतील शेवटचा वनडे खेळणार? बीसीसीआयने सुद्धा मेसेज दिल्याची चर्चा रंगली
टीम इंडियाच्या हिटमॅन पर्वाचा उद्या अस्त होणार? रोहित कारकिर्दीतील शेवटचा वनडे खेळणार? बीसीसीआयने सुद्धा मेसेज दिल्याची चर्चा रंगली
Shivsena UBT : ओमराजे निंबाळकरांचा सांगलीहून जाऊन त्यांचा प्रचार केला, अहोरात्र झटलो त्याचा हिशोब चुकता करणार, ठाकरेंच्या तालुकाप्रमुखांचा इशारा
गद्दारांनो ठाकरे कधी संपत नसतात..., ठाकरेंच्या मेळाव्यासाठी आलेले शिवसैनिक प्रचंड संतापले
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?
कॉकरोच जनता पक्षाचा उद्या दिल्लीत दुसऱ्यांदा एल्गार अन् आज अभिजित दीपकेंनं थेट पीएम मोदींना पत्र लिहिलं, कोणती मागणी केली?
Thane Politics : टीडीआरनंतर आता डेटा सेंटर घोटाळा, ठाणेकरांचा जीव धोक्यात; ॲमेझॉनच्या प्रकल्पावरुन जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
टीडीआरनंतर आता डेटा सेंटर घोटाळा, ठाणेकरांचा जीव धोक्यात; ॲमेझॉनच्या प्रकल्पावरुन जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
Embed widget