Mahashivratri 2021 Live : भीमाशंकरमध्ये महाशिवरात्र संपन्न, कोरोनामुळं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजाविधी
Mahashivratri Puja Vidhi Shubh Muhurat LIVE Updates : आज महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. आज देशासह राज्यभरात महाशिवरात्री निमित्त शिवमंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोनामुळं भक्तांची गर्दी मात्र नाही.
LIVE
Background
Maha Shivaratri 2021 : आज महाशिवरात्री. भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा कोरोनामुळं भाविकांवर मंदिरांमध्ये जाण्यासाठी अटकाव असला तरी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी असते. या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. यंदा 11 मार्च रोजी बुधवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या वाईट प्रवृत्तींपासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्लेश्वरला महाशिवरात्री अत्यंत साधेपणानं साजरी
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा मार्लेश्वरच्या ठिकाणी देखील महाशिवरात्र अत्यंत साधेपणानं साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाविकांनी देखील या ठिकाणी न येण्याचं आवाहन करण्यात आलं. शंभुमहादेवाच्या प्रसिद्ध अशा मार्लेश्वरच्या ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे केवळ शंकराची पूजाअर्चा करत आजची महाशिवरात्र साधेपणानं साजरी करण्यात आली.
भीमाशंकरमध्ये महाशिवरात्र संपन्न, कोरोनामुळं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजाविधी
बारा जोतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर येथे महाशिवरात्र संपन्न झाली. कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच व्यक्तींना उपस्थिती लावता आली. कोणताही खंड पडू न देता परंपरागत सर्व पूजा मात्र पार पडत आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांच्या हस्ते दुग्धाभिषेक पार पडला. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली, तर विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झगमगून गेलाय.
51 किलो चक्क्यापासून शंकराची पिंड
आज महाशिवरात्री. या निमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध श्री लक्ष्मी बाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये 51 किलो चक्क्यापासून शंकराची पिंड तयार करण्यात आली आहे. अशा पद्धतीने पिंड साकारण्याचे यंदाचे सहावे वर्ष आहे. वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मंदिरं भाविकांसाठी बंद आहे. अनेक मंदिरांमध्ये भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आहे.
बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराचे मंदिर आज बंद
बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराचे मंदिर आज बंद ठेवण्यात आलंय. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट आहे. शिवभक्तांना मंदिराच्या बाहेरच दर्शन घेऊन परतावे लागतंय. महाशिवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी भरणारी यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्यानं दरवर्षी दिसणारी शिवभक्तांची गर्दी मात्र यंदा दिसत नाही. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठीची खबरदारी म्हणून यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं मंदिर बंद ठेवण्यात आलंय. महाशिवरात्रीला देशभरातील शिवभक्त वेरूळला लाखोच्या संख्येने येत असतात. महाशिवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या गृहविभागाच्या सुचना आहेत. तसेच दरवर्षी होणारे कार्यक्रम यंदा होणार नाहीत.
इतिहासात पहिल्यांदाच भक्तांविना औंढ्यात महाशिवरात्री उत्सव
बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे आणि महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव इतिहासात पहिल्यांदाच भक्तां विना होतोय औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव देशभरात परिचित आहे.दरवर्षी महाशिवरातत्री ला मंदिर परिसरामध्ये नागनाथाची रथामध्ये परिक्रमा करण्यात येते त्याला देशभरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रात्री साडेबारा वाजता आमदार संतोष बांगर तहसीलदार कृष्णा कानगुले विस्वस्थ ऍड राजेश पतंगे या तिघांनीही सपत्नीक महापुजा याठिकाणी केली त्यानंतर परत मंदिर बंद करण्यात आले आहे.मंदिर परिसरात ठिकठिकाणी पोलिसांनी बाराकॅट लावले आहेत.औंढा शहरातही सर्वत्र पोलिस मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय ज्यामुळे दरवर्षी ज्या औंढ्यात आजच्या दिवशी पाय ठेवायला जागा नसते तिथं शुकशुकाट पाहायला मिळत आहे.