(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushma Andhare : ....हा तर शुभशकुन, गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
महाप्रबोधन यात्रेतील (Maha Prabodhan Yatra) ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sushma Andhare : महाप्रबोधन यात्रेतील (Maha Prabodhan Yatra) ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सुषमा अंधारे, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांचा समावेश आहे. या पाच जणांवर कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, तरीसुद्धा राज्य शासनाने दाखल केलेला हा गुन्हा शुभशकुन असल्याचं अंधारे यांनी म्हटलंय.
नेमकं काय म्हणाल्यात सुषमा अंधारे
महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून मी स्वतः, खासादर राजन विचारे, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि आमच्या अनिताताई बिर्जे अशा पाच जणांवर 153 नुसार गुन्हा दाखल झाल्याचे समजते. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत तरीसुद्धा राज्य शासनाने दाखल केलेला हा गुन्हा शुभशकुन आहे. असं ट्वीट सुषमा अंधारे यांनी केलं आहे.
नेमका प्रकार काय घडला
ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतील नेत्यांवर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यातील भाषणात सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाचे बाळा गवस यांनी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनात ठाकरे गटाच्या महाप्रबोधनयात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांनी भाषणे केले. यावेळी या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य करत शिंदे, यांची प्रतिमा मलीन केली. याबरोबरच इतर राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवत हा गुन्हा दाखल केला.
महत्त्वाच्या बातम्या: