ज्या झाडाने सावली दिली, त्याच झाडावर घाव घालताना शिंदेंना काहीच वाटलं नाही? सुषमा अंधारेंची घणाघाती टीका
Sushma Andhare On bjp Eknath shinde : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. ज्या झाडाने सावली दिली, ज्याची फळे चाखली, त्याच झाडावर घाव घालताना एकनाथ शिंदेंना काहीच वाटलं नाही का? कायं असा प्रश्न अंधारे यांनी विचारलाय.

मुंबई : ज्या झाडाने सावली दिली, ज्याची फळे चाखली, त्याच झाडावर घाव घालताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde ) तुम्हाला काहीच वाटलं नाही का? असा प्रश्न शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. निवडणूक आयोगाने शिनसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजयकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सुषमा अंधारे यांनी यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केलीय.
"ज्या झाडांनी तुम्हाला सावली दिली, ज्या झाडाची फळे चाखलीत, ज्या झाडाने तुम्हाला इतकं काही दिलं त्या झाडावर घाव घालताना शिंदेजी तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही, असा प्रश्न अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलाय. याबरोबरच कुऱ्हाड देणारे हात भाजपचे असल्याचा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केलाय.
"सध्या मेरी लाठी मेरी बैसे असा प्रकार चालू आहे. आपल्याला अनुकल असणारे निर्णय घेतले जात आहेत. अंधेरी निवडणुकीमुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, तुम्ही खरचं शिवसेना वाचवण्यासाठी निघाला असाल तर जी जागा मूळ शिवसेनेची आहे ती भाजपासठी कशी सोडलीत? शिंदे गटाने ती जागा का लढवली नाही? असे प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केलाय.
भाजपने शिवसेना संपवायला लावली आहे असा आरोप करत सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसेना संपवण्याचा प्लॅन सक्सेस करण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदे यांचा वापर केला जात आहे. प्लॅन सक्सेस झाल्यावर शिंदेंना देखील भाजपकडून संपवले जाईल. एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना उद्धव ठाकरे पक्षात परत घेतील का यावर देखील सुषमा अंधारे यांनी आपले मत व्यक्त केले. मातोश्री नाव आहे. आई सर्वांना प्रेमाने जवळ घेते, परंतू या सर्वांनी एवढं अती वागायचं ठरवलंय, त्यामुळे अती तेथे माती असं खोचक वक्त्यव अंधारे यांनी यावेळी केलं आहे.
दरम्यान, निवडूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर नव्या चिन्हासाठी ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. हे तीनही पर्याय निवडणूक आयोगाकडे शिल्लक असलेल्या चिन्हांच्या यादीत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यादीत नसलेले चिन्ह आयोग कसं काय देणार, यावर तोडगा काय निघणार, किंवा ठाकरे गटाने दिलेल्या पर्यायांपैकी चिन्ह मिळणार का हे लवकरच स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
Majha Katta : तुम्ही चुकीच्या वेळेस आलात, पक्षप्रवेश करताना उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंना काय म्हणाले होते
शिवाजी पार्कात सोनिया गांधींचे विचार ऐकायला मिळणार म्हणणाऱ्या नारायण राणेंचा सुषमा अंधारेंकडून समाचार, म्हणाल्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
