एक्स्प्लोर

Maghi Ekadashi 2022 : 'अवघे गरजे पंढरपूर'... माघी एकादशीनिमित्त कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच गजबजली पंढरी; चार लाख भाविक दाखल

Maghi Ekadashi 2022 :  आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. जवळपास चार लाख भाविक या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल झाल्याने पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली आहे.

Maghi Ekadashi 2022 :  आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. कोरोनाच्या महामारीनंतर जवळपास सहा महत्वाच्या वाऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आजची माघी वारी कोरोना नंतरची पहिली वारी आहे ज्या वारीला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामुळं वारकऱ्यांमध्ये देखील चैतन्याचं वातावरण आहे. दरम्यान माघीच्या निमित्तानं विठुरायाची महापूजा मंदिर समितीचे सदस्य अतुल महाराज भगरे यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची महापूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पार पडली. एसटीचा संप असूनही जवळपास चार लाख भाविक या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल झाल्याने पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली आहे. विठुरायाच्या प्रमुख यात्रांपैकी माघी यात्रा ओळखली जाते. आज या सोहळ्यानिमित्त विठुरायाची महापूजा भगरे गुरुजी यांनी सपत्नीक केली. रुक्मिणी मातेची महापूजा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सपत्नीक केली. 

आज जया एकादशीच्या मुहूर्तावर अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मंदिर समितीच्या नवीन वर्षाची डायरी आणि दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा देखील संपन्न झाला. यावेळी मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, मुख्याधिकारी अरविंद माळी, तहसीलदार बेल्हेकर आणि मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. 

विठ्ठल मंदिराची आकर्षक सजावट

आज जया एकादशीचे औचित्य साधून पुणे येथील भक्त सचिन चव्हाण, संदीप पोकळे आणि युवराज सोनार यांनी एक हजार किलो फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आजच्या सजावटीमध्ये झेंडू, अष्टर, शेवंती, कामिनी, ओर्केट, जरबेरा अशा विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून सुंदर आणि मनमोहक सजावट करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी या ठिकाणी ही फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे.

माघी यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात दाखल

माघी यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल मंदिर , प्रदक्षिणा मार्ग , चंद्रभागा वाळवंट आणि दर्शन रांगेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

इतर संबंधित बातम्या

Maghi Ekadashi Photo : आज माघी एकादशी; पाहा विठुरायाचे सावळे सुंदर रुप मनोहर

Maghi Ekadashi : वारकऱ्यांनो ही बातमी वाचा! चंद्रभागेचे पाणी पिण्यास अयोग्य, तीर्थ म्हणून प्राशन करु नका

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Embed widget