मोठी बातमी! शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, मोहिते पाटील हाती घेणार तुतारी, लवकरच होणार पक्षप्रवेश
अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Madha Loksabha Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. अकलूजचे मोहिते पाटील (Mohite Patil) लवकरच शरद पवार (Sharad pawar) यांच्या राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील (Jaisingh Mohite Patil) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची उद्या शरद पवार यांच्यासोबत मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळं उद्याच धैर्यशील मोहिते पाटलांना प्रवेश देवून त्यांची माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर माढा लोकसभा लढवणार
दरम्यान, मोहिते पाटलांचा भाज प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळं आता धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्ह घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार असल्याची
दरम्यान, जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत. बाकी सर्व मोहिते पाटील परिवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाणार असल्याचे जयसिंह मोहिते पाटील म्हणाले.
धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदावारी न दिल्यामुळं मोहिते पाटील कुटुंब भाजपवर नाराज
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदावारी न दिल्यामुळं मोहिते पाटील कुटुंब नाराज आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं या मतदारसंघात मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. कोणत्याही स्थितीत लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. तर काही कार्यकर्ते मोहिते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत. त्यामुळं मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील तुल्यबळ लढत होणार
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात जर रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत झाली तर ही लढत तुल्यबळ होणार असल्याचं बोललं जात आहे. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकरांना माळशिरस तालुक्यातून 1 लाखाहून अधिक मताधिक्क्य दिलं होतं. त्यामुळं या मतदारसंघात मोहिते पाटील यांचीदेखील चांगली ताकद आहे. तर दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकर यांच्यामागे माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, माण खटाव या तालुक्याचे आमदार आहेत.
महत्वाच्या बातम्या: