एक्स्प्लोर

अधिकाऱ्याची तत्परता... वाशिममधील हरवलेलं कुटुंब तब्बल साडेतीन वर्षानंतर एकत्र आलं

एखाद्या  चित्रपटाला  शोभेल अशी घटना वाशिममध्ये समोर आली आहे. हरवलेलं कुटुंब तब्बल साडे तीन वर्षानंतर  एकत्र आणण्याचं काम वाशीमच्या महिला बाल कल्याण अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.

वाशिम : एखादं कुटुंब अपघातात हरवतं  किंवा एखाद्या यात्रेत दुरावतं. नंतर ते कुटुंब 15 ते 20 वर्षानंतर पुन्हा परत एकत्र येतं, असं आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल.  एखाद्या  चित्रपटाला  शोभेल अशी घटना वाशिममध्ये समोर आली आहे. हरवलेलं कुटुंब तब्बल साडे तीन वर्षानंतर  एकत्र आणण्याचं काम वाशीमच्या महिला बाल कल्याण अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.

सविस्तर माहिती अशी कि, यवतमाळ  जिल्ह्यातील वडद गावचे बाळू राठोड यांचं कुटुंब  पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात नाशिक जिल्ह्यात गेले होतं. कामाच्या शोधानंतर  त्यांना काही दिवसानंतर उसतोडणीचं कामही मिळालं. बाळू राठोड व त्यांचं कुटुंब काम करून आपला उदरनिर्वाह करत होते मात्र यवतमाळ जिल्ह्यातील एका नातेवाईकाचा मृत्यू झाला आणि बाळू राठोड हे गावी निघाले. कुटुंबाला नाशिकला सोडून ते परत येणार होते मात्र बाळूची पत्नी अर्चना व छोटा मुलगा कुमार यांची रेल्वे स्टेशनवरून ताटातूट झाली.   

बाळू जेव्हा नाशिकला  परत गेले, तेव्हा  त्यांना ही घटना कळली अन् त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हरवलेल्या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरवात केली मात्र यश मिळत नव्हतं.  तशी तक्रारही त्यांनी पोलिसात दिली. मात्र शोध लागत नसल्याने सगळ्या आशा संपल्या होत्या. कुटुंबातील दोन सदस्य हरवल्याने कुटुंबावर संकट कोसळले. राठोड कुटुंब शोधून थकले मात्र यश काही मिळत नव्हते. 

एक दिवस वाशिमचे महिला बालकल्याण अधिकारी यांना चेन्नईवरून फोन आला कि वाशीम आणि याडी उद्गारणारे एक बालक सापडले आहे. दीड वर्षापासून ते आमच्याकडे आहे. ओळख पटत असेल तर सांगा याडी शब्द म्हणजे बंजारा भाषेतील आई होतो आणि वाशीमचे  सुभाष राठोड हे देखील बंजारा असल्याने त्यांनी त्या मुलाला बंजारा भाषेत बोलले आणि  आशेचा किरण गवसला.

अधिकाऱ्याची तत्परता... वाशिममधील हरवलेलं कुटुंब तब्बल साडेतीन वर्षानंतर एकत्र आलं

वाशीम जिल्ह्यात कुणी बालक हरवला का? याचा  शोध घेतल्यानंतर माहिती मिळाली कि वाशीमचा कुणी बालक नसून  यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वडद गावातील एक बंजारा कुटुंबातील दोन सदस्य हरवले आहेत. त्यानंतर त्यांना वाशीम बोलावून चौकशी केली असता हरवलेल्या मुलाचा अंदाज घेतल्यानंतर कुमारला चेन्नई येथून वाशीम इथं आणलं गेलं. तब्बल दीड वर्षा नंतर पालकांना कुमारने ओळखले. अधिकाऱ्यांनी हरवलेलं बालक पालकांच्या स्वाधीन केले. 

अधिकाऱ्याची तत्परता... वाशिममधील हरवलेलं कुटुंब तब्बल साडेतीन वर्षानंतर एकत्र आलं

महिला बालकल्याण अधिकारी सुभाष  राठोड यांनी सांगितलं की, कुटुंबापासून दूर झालेल्या कुमारला शोधणं आव्हान होतं. त्याला फक्त स्वत:च नावच येत होतं. वाशीम आणि बंजारा  शब्द आई म्हणजे याडी यायचं.  तर आई मानसिक रुग्ण होती त्यामुळे शोध घेणं कठीण होतं. मात्र वाशीम नावामुळे कुमार हा चेन्नईमध्ये सापडला तो दीड वर्षानंतर तर कुमारची आई अर्चना राठोड यांना देखील दोन वर्षानंतर गुजरातच्या सुरतमधील महिला आश्रम मधून शोधून काढण्यात यश आले.  

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'दो बूंदें जिंदगी की' ते 'हर घर कुछ कहता है' ते 'मिले सुर मेरा तुम्हारा'चे रचनाकार पीयूष पांडे यांचे निधन; भारतीय जाहिरांतीमधील 'बाप'पण हरवलं
'दो बूंदें जिंदगी की' ते 'हर घर कुछ कहता है' ते 'मिले सुर मेरा तुम्हारा'चे रचनाकार पीयूष पांडे यांचे निधन; भारतीय जाहिरांतीमधील 'बाप'पण हरवलं
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sujat Ambedkar on RSS : संघाला झुकवून संविधान मानायला लावू, सुजात आंबेडकरांचा इशारा
Satara Doctor case : वर्दीला कलंक, फलटणमध्ये रक्षकच बनला भक्षक
Bawankule vs Raut : बावनकुळेंचे वादग्रस्त वक्तव्य, व्हॉट्सॲप ग्रुप सर्वेलन्सवर?
Medical Negligence: 'डॉक्टर नव्हते, नर्सनेच डिलिव्हरी केली', पालघरमध्ये नवजात बाळाचा मृत्यू
Satara Doctor case : राजकीय-पोलीसांच्या दबावामुळे बहिणीने आत्महत्या केली, कुटुंबीयांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दो बूंदें जिंदगी की' ते 'हर घर कुछ कहता है' ते 'मिले सुर मेरा तुम्हारा'चे रचनाकार पीयूष पांडे यांचे निधन; भारतीय जाहिरांतीमधील 'बाप'पण हरवलं
'दो बूंदें जिंदगी की' ते 'हर घर कुछ कहता है' ते 'मिले सुर मेरा तुम्हारा'चे रचनाकार पीयूष पांडे यांचे निधन; भारतीय जाहिरांतीमधील 'बाप'पण हरवलं
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
त्या नामांकित हाॅटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर रात्री कशी पोहोचली? आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय?
Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात
Satara Doctor Case: 'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
'तेव्हापासून म्हणत होती मी आयुष्य संपवणार' साताऱ्यातील मयत महिला डॉक्टरच्या काकांनी रडत रडतच PI कडून पुतणीच्या छळाचा पाढाच वाचला
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अल्पवयीन व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
ओला-उबरवर आता सरकारी कॅबचा उतारा; देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी लाँच, मराठीतूनही अॅप, सेवा कशी मिळवता येईल?
Nashik Crime: नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांचे नुकसान; पोलिसांकडून मिळाला 'फराळ'
नाशिकमध्ये झिंगाट तरुणांचा हैदोस, आधी नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडले, नंतर दगडं फेकून वाहनांचे नुकसान; पोलिसांकडून मिळाला 'फराळ'
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Embed widget