एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत चार जोडप्यांची प्रतिष्ठा पणाला; यवतमाळ,अमरावती, धारशिव अन् बारामतीत नेमका कौल कुणाला?  

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खास करून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पती-पत्नीच्या अशा चार जोड्या राजकीय विजयासाठी संघर्ष करत आहेत. विशेष म्हणजे चारही ठिकाणी पत्नी निवडणुकीच्या मैदानात आहे.

Loksabha Election 2024 : जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात पतीला पत्नीची आणि पत्नीला पतीची साथ मोलाची ठरते आणि राजकारणही त्यापासून वेगळं नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खास करून लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) मैदानात पती-पत्नीच्या अशा चार जोड्या राजकीय विजयासाठी संघर्ष करत आहेत. विशेष म्हणजे चारही ठिकाणी पत्नी निवडणुकीच्या मैदानात आहे. तर त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या आमदार - खासदार असलेल्या पतींनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे नवरा-बायकोच्या या चारही जोड्या महायुतीच्या बाजूने मैदानात उतरल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय. यात  यवतमाळ, अमरावती, धारशिव अन् बारामती या चार लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

बारामतीसाठी सुनेत्रा पवार मैदानात

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातली सर्वात हॉट सीट म्हणजे बारामती. बारामतीची जागा ननंद-भावजयाच्या संघर्षामुळे जेवढी चर्चेत आहे, तेवढीच आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे पती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय संघर्षामुळेही बारामती सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्हावर नियंत्रण मिळवल्यानंतर अजित दादा यांना बारामतीचा किल्ला ही स्वतःकडे हवा आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले आहे.

मात्र, पन्नास वर्ष शरद पवारांनी बांधलेलं बारामती मतदारसंघ स्वतःकडे खेचणं एवढं सोपं नाही आणि पत्नीला निवडणुकीच्या मैदानात विजय मिळवण्यासाठी हे लक्षात आल्यानंतरच आपल्या तापट स्वभावासाठी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जाणारे अजितदादा ही सध्या काहीसे नरमलेले दिसून येत आहे. त्यामुळेच कधी ते कट्टर राजकीय विरोधकांसोबत सेल्फी काढताना दिसतात. तर कधी ते सुनेत्राताईना पाठिंबा द्या यासाठी भाषणातून आर्जव करताना दिसतात.

धाराशिव मतदारसंघात कौल कुणाला? 

नवरा बायकोची अशीच एक जोडी बारामतीच्या शेजारी असलेल्या धाराशिव मतदारसंघातही पाहायला मिळत आहे. धाराशिवमध्ये महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांना मैदानात उतरवले आहे. अर्चना पाटील ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांच्या सून आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.

धाराशिव मध्ये आपल्या पत्नीच्या विजयासाठी राणा जगजीतसिंह पाटील जोरदार किल्ला लढवत आहेत. एका बाजूला अर्चना पाटील मतदारसंघात ठिकठिकाणी जाऊन सभा घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राणा जगजितसिंह पाटील राजकीय समीकरण चाकचौबंद ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

बहूचर्चित अमरावती मतदारसंघात तिरंगी लढत

लोकसभा निवडणुकीच्या मैदानातील तिसरी जोडी म्हणजे अमरावती मधील राणा दाम्पत्य. नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्षातून भाजपमधील प्रवेश असो की नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र संदर्भातला न्यायालयीन लढा असो. रवी राणा यांनी प्रत्येक पातळीवर आपल्या पत्नी नवनीत राणा यांना खंबीर साथ दिलीय. स्थानिक राजकीय गणित लक्षात घेऊन पत्नी जरी भाजपमध्ये गेली असली, तरी रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षातच कायम राहून नवनीत राणा यांना अमरावती मधून निवडून आणण्यासाठी जीवाचा रान केल्याचं गेल्या काही दिवसात पाहायला मिळालं.

मतदारा राजाचा कौल कुणाला? 

लोकसभा निवडणुकीच्या मैदानातील चौथी जोडी म्हणजे यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील या होय. महायुती मधील राजकीय रस्सीखेचमुळे अखेरच्या क्षणी हेमंत पाटलांची हिंगोली मधील जाहीर झालेली उमेदवारी रद्द झाली आणि शेजारच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी समोर असताना पाटील दांपत्यांनी दोन जिल्ह्यात विस्तारलेल्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात जोरात प्रचार केला. एका बाजूला राजश्री पाटील महायुतीच्या स्थानिक नेत्यांसोबत प्रचार करत राहिल्या. तर दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील यांनी आपल्या राजकीय अनुभवातून पडद्यामागून राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न केले.

आता पती-पत्नीच्या राजकीय मैदानातील या जोड्यांना महाराष्ट्रातील मतदारांचा कौल मिळतो की नाही, हे चार जूनला स्पष्ट होईल. या चारही जोड्यांमधील पती आपल्या पत्नींच्या पदरी यश टाकण्यामध्ये यशस्वी होतात की त्यांच्या राजकारणापायी पत्नीच्या वाट्याला पराभवाचा फटका येतो, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 28 March 2025Kunal Kamra Update : येत्या ३१ मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर राहणारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 28 March 2025Disha Salian Case News : दिशा सालियन प्रकरणावरुन राजकीय घमासान, सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, 7 वर्षातील सर्वात कमी वाढ, पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, पगार किती रुपयांनी वाढला?
Embed widget