एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ मतदारसंघात 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध; पाहा कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार?

Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिल 2024 ही असून, या मतदारसंघांसाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होईल.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या उमेदवारी अर्जांच्या (Candidate Application) छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पाहिल्यास बुलढाणा 25, अकोला 17, अमरावती 56, वर्धा 26, यवतमाळ-वाशिम 20, हिंगोली 48, नांदेड 66, आणि परभणी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिल 2024 ही असून, या मतदारसंघांसाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होईल.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात बुलढाणा (Buldhana), अकोला (Akola), अमरावती (Amravati), वर्धा (Wardha), यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim), हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded) आणि परभणी (Parbhani) लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. विशेष म्हणजे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळपर्यंत एकूण 352 उमेदवारांचे 477 अर्ज दाखल झाले होते. पण एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. 

कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज दाखल झाले होते?

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा 29 उमेदवारांचे 42 अर्ज, अकोला 28 उमेदवारांचे 40, अमरावती 59 उमेदवारांचे 73, वर्धा 27 उमेदवारांचे 38, यवतमाळ- वाशिम 38 उमेदवारांचे 49, हिंगोली 55 उमेदवारांचे 78, नांदेड 74 उमेदवारांचे 92 आणि परभणी 42 उमेदवारांचे 65 अर्ज दाखल झाले होते.

उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची दक्षता

  • इच्छुक उमेदवार व समर्थकांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहने आणता येणार आहेत. 
  • यासाठी पोलिस अधिकारी त्या ठिकाणी शंभर मीटर परिसराची निश्चिती ( मार्कींग) आधीच केली जाईल. 
  • निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवार आणि त्यांच्या समवेत चार व्यक्ती अशा एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. 
  • निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात एकाच दाराने प्रवेश देण्यात येईल. 
  • या संपूर्ण प्रक्रियेचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येईल. 
  • निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी पोलिस विभागाकडून सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून, पोलिस नोडल अधिकारी या ठिकाणी आवश्यक पोलिस बंदोबस्तासह उपस्थित राहतील.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nana Patole : आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला अजूनही तयार, नाना पटोलेंची पुन्हा प्रकाश आंबेडकरांना ऑफर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget