एक्स्प्लोर

Anil Deshmukh on Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा

चार जूनच्या निकालापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निकालावरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अनिल देशमुख यांनी गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधून रसद पुरवली गेली, असा गंभीर आरोप केला आहे.

Anil Deshmukh on Nitin Gadkari : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर आता भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. राऊतांच्या आरोपांवर खंडन करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार अनिल देशमुख यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. 

गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधून रसद पुरवली गेली

अनिल देशमुख यांनी सुद्धा गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधून रसद पुरवली गेली, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे चार जूनच्या निकालापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निकालावरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राऊत यांनी सामनामधून रोखठोक सदरामध्ये केलेल्या आरोपांनंतर देशमुख यांनी सांगितले की, गडकरी यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्याच पक्षाने मदत केली हे सर्व नागपूरला माहिती आहे. त्यामुळे संजय राऊत जे रोखठोकमधून बोललं आहे ते सर्व खरं आहे. नागपूर लोकसभेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेनं एकत्र काम केलं, पण त्यामध्ये बोनस मिळत असेल तर कोणाला नको? अशी विचारणा त्यांनी केली. 

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे की, गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.

संजय राऊतांचे डोकं तपासावं लागेल

दरम्यान, राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. राऊतांचे डोकं तपासावं लागेल, तेवढंच राहिलं असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावा लागेल. 

राऊत यांनी मूर्खा सारखं स्टेटमेंट केलं 

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनीही राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी मूर्खा सारखं स्टेटमेंट केलं आहे. राऊत यांना सांगून पडण्याचा डाव रचण्यात येणार का? नेत्यांच्या स्तरावर असल्या गोष्टी होतं नाहीत. गडकरी 100 टक्के निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
Pooja Khedkar : फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi in Parbhani : सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा थेट आरोपSomnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हानNitin Gadkari on Nagpur :  नितीन गडकरींनी नागपुरकरांची माफी का मागितली ?Ajit Pawar Full PC : तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न ; आम्ही सोडवू, अजित पवार भुजबळावर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
Pooja Khedkar : फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट बीडमध्ये, नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा; 28 डिसेंबरची डेडलाईन
Nitin Gadkari : विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई, गडकरी गरजले! अधिकाऱ्यांना अल्टिमेटम, जनतेची माफी
विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई, गडकरी गरजले! अधिकाऱ्यांना अल्टिमेटम, जनतेची माफी
मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला
मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला
Mohammed Shami and Sania Mirza : मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या; त्या फोटोंमागील सत्य काय?
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या; त्या फोटोंमागील सत्य काय?
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
Embed widget