एक्स्प्लोर

कोल्हापुरात लॉकडाऊन सुरु होताच भरचौकात तरुणांची नाचगाणी, पोलिसांकडून चोप

सोमवारसाठी कोल्हापूर पोलिसांची तयारी सुरु अशा कॅप्शनसह एक व्हिडीओ शेअर झाला होता. यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस लाठ्यांना तेल लावताना दिसत आहेत. पण खरंच कोल्हापूर पोलिसांना एवढ्या लवकर लाठ्यांचा वापर करावा लागेल हे कोणालाही वाटलं नव्हतं. लॉकडाऊन सुरु होताच पहाटे तीन वाजता भरचौकात मोठ्या आवाजात गाणी लावून नाचणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

कोल्हापूर : कोल्हापुरात मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून पुढील पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील कोणालाही प्रवेश मिळणार नाही. परंतु या कडक लॉकडाऊनला काही तरुणांनी सुरुवातीलाच सुरुंग लावला. रंकाळा तलावाजवळच्या जावळा गणपती चौकात तीन तरुण पहाटे तीन वाजता मोठ्या आवाजात गाणी लावून आणि नाचत होते. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि लाठ्यांनी चांगलाच प्रसाद दिला. अभिनेता स्वप्नील राजशेखर यांच्या घराखाली हा प्रकार घडला. त्यांनीच हा व्हिडीओ शूट करुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण गाणी लावून नाचत होते. तर एक जण त्यांचा व्हिडीओ बनवत होता. यानंतर पोलीस तिथे आले. तेवढ्यात एका तरुणाने बाईकवरुन पळ काढला. तर दोघे गाडीत लपले. त्यातला एक जण पोलिसांच्या तावडीत सापडला तर गाडीतील दुसऱ्याने संधी साधून तिथून पळ काढला. मग पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या एकाला पोलिसांनी चांगलाच चोप दिला आणि इतर दोघांना बोलावण्यास सांगितलं. Kolhapur Lockdown | पुढील 15 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात ‘नो एन्ट्री’ कोल्हापुरात सात दिवसांचा लॉकडाऊन कोल्हापुरात आजपासून (20 जुलै) सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही घोषणा केली. त्यानंतर पुढील पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील कोणालाही प्रवेश मिळणार नाही, असा आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी काढला. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारे ई-पासही बंद केले आहेत. जिल्ह्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आलं आहे. लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत. या लॉकडाऊनमध्ये सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. परंतु या तीन तरुणांनी लॉकडाऊनला सुरुवात होताच चौकात येऊन मोठ्या आवाजात गाणी लावून नाच करु लागल्याने पोलिसांनी चांगला चोप दिला. त्यामुळे पुढील सात दिवस लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना काय शिक्षा मिळेल याची झलक पोलिसांनी दाखवली. कोल्हापुरात कोरोनाचे वाढते रुग्ण कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पण जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. Kolhapur Lockdown | भर चौकात नाचणाऱ्यांना पोलिसांचा चोप;अभिनेता स्वप्नील राजशेखरच्या घराखालचा प्रकार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBadlapur Case : बदलापूर घटनेतील फरार आरोपींना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Embed widget