Hake Health Update : लक्ष्मण हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली; बीपी वाढला, हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका,डॉक्टरांनी व्यक्त केली भीती
Laxman Hake Health Update : गेल्या तीन दिवसापासून ब्लडप्रेशर वाढत असल्याने त्यांना हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका उद्भवू शकतो अशी माहिती डॉक्टरांना दिली आहे.
जालना : ओबीसी नेते (OBC Reservation) लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या आंदोलनाचा आजाचा सातवा दिवस आहे दरम्यान हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली आहे. उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केलीये. त्यामुळे त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. मात्र हाकेंनी उपचार घेण्यास नकार दिलाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार आहेत. प्रकाश आंबेडकरही उद्या भेट घेणार आहेत.
लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावत आहे. गेल्या तीन दिवसापासून ब्लडप्रेशर वाढत असल्याने त्यांना हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका उद्भवू शकतो अशी माहिती डॉक्टरांना दिली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने उपचाराची गरज असल्याचे देखील डॉक्टरांचे म्हणणं आहे. प्रकृती खालावत आहे. आजही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.जवळपास 178 हाय ब्लड प्रेशर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल आहे. लक्ष्मण हाके यांचे वजन 83 किलो होते. आज त्यांचे वजन 75 किलो झाले आहे.
शासनाने आतापर्यंत आंदोलनाची दाखल घ्यायला हवी होती : लक्ष्मण हाके
लक्ष्मण हाके म्हणाले, महाराष्ट्रातल्या शासनाने आतापर्यंत दाखल घ्यायला हवी होती. आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत. आम्ही कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही. आमची दखल नका घेऊ पण VJ एनटी ओबीसींची बाजू काय आहे हे तरी समजून घ्या. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कायम फेसलेस राहिला आहे.
मनोज जरांगेचे सल्लागार कोण आहेत? हाकेंचा सवाल
महाराष्ट्रातील गरजवंत मराठा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, म्हणून त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो हे कोणी सांगितले. आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. माय बाप सरकार समजून घ्या. मी घरापासून दूर आलो तरी जालना, बीड, परभणी भागात मी गेलेलो आहे. खरं बोलायला तयार नाहीत महाराष्ट्रातील शासन करते, ते दूर पळत आहेत. जरांगे जी बाजू मांडत आहेत त्याचे उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे. ओबीसी आरक्षण मिळाल्यावर मराठा समाजाला न्याय मिळतो हे सांगणारे जरांगेचे सल्लागार कोण आहेत? असा सवाल देखील हाके म्हणाले.
Video :
ग
हे ही वाचा :