टाकळीच्या धनगर तरुणाला एवढं मारलं की शेवटी जीव गमावलाच, धनगर समाजानं दिला आंदोलनाचा इशारा, लक्ष्मण हाकेही येणार..
पोलिसांनी त्याच वेळेस जबाब घेतला असता तर आरोपींच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला असता मात्र पोलिसांनी यात तत्परता दाखवली नाही, असा आरोप आता माऊलीच्या नातेवाईकांनी आणि धनगर समाजाने केला आहे.
Latur: परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण, मस्साजोगचे संतोष देशमुख हत्याप्रकरणापाठोपाठ राज्यातील गुन्हेगारी घटना बाहेर येऊ लागल्या आहेत. (Crime News) भरदिवसा मारहाण, हत्या अशा गंभीर घटना घडत लातूरमध्ये टाकळी येथे धनगर समाजाच्या 18 वर्षीय तरुणाला गावातीलच सात आठ जोकांनी जबर मारहाण केली होती. यानंतर दोन महिने उपचार करूनही प्रकृती न सुधारल्याने 6 जानेवारीला त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेविरोधात या कुटुंबाने आणि धनगर समाजाने योग्य ती कारवाई करावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या कुटुंबाला भेटण्यासाठी लक्ष्मण हाके लातूरमध्ये येणार असल्याची माहिती .आहे.
काय आहे प्रकरण?
माऊली उमाकांत सोट या 18 वर्षीय तरुणाला गावातीलच कमलाकर डुरे गोपाळ डुरे गोविंद खेडकर मनोज उपाडे कुमार उपाडे बालाजी खेडकर रंगनाथ डूरे यासह इतर आरोपींनी घरी बोलून जबर मारहाण 27/ 10 /2024 रोजी केली होती. घटनास्थळी पोलीस तब्बल दोन ते तीन तासानंतर आले. दोन दिवस माऊली शुद्धीवर होता या काळात पोलिसांनी त्याचा जबाब घेतला नाही. त्यानंतर माऊली कोमात गेला . दोन महिने सातत्याने उपचार केल्यानंतर सुद्धा त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. सहा जानेवारी रोजी माऊलीचा मृत्यू झाला.पोलिसांनी त्याच वेळेस जबाब घेतला असता तर आरोपींच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला असता मात्र पोलिसांनी यात तत्परता दाखवली नाही, असा आरोप आता माऊलीच्या नातेवाईकांनी आणि धनगर समाजाने केला आहे. या प्रकरणात आता लक्ष्मण हाके हे नातेवाईकांची भेट घेणार आहेत.
लक्ष्मण हाकेंची सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियांना भेट
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आता परभणीत दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. परभणीत ते सुर्यांवशी नातेवाईकांच्यायां घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी लक्ष्मण हाकेंसह अनेक ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला.
हेही वाचा: