एक्स्प्लोर
Advertisement
कॉफी शॉप्सवर छापे, अश्लील चाळे करणारे तरुण-तरुणी ताब्यात
दोन कॉफी शॉप्सवर टाकलेल्या छाप्यात अल्पवयीन तरुणींसह 15 ते 20 तरुण-तरुणींना अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडण्यात आलं.
लातूर : कॉफी शॉप्सवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींना रंगेहाथ पकडलं. लातुरातील दामिनी पथकाने केलेल्या कारवाईत अल्पवयीन मुलींसह 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
लातूरच्या कॉलेज परिसरात अनेक कॉफी शॉप्स आहेत. इथे अश्लील चाळे सुरु असल्याचा सुगावा लातूर पोलिसांना लागताच दामिनी पथकाने कॉफी शॉपवर धाड टाकली.
दोन कॉफी शॉप्सवर टाकलेल्या छाप्यात अल्पवयीन तरुणींसह 15 ते 20 तरुण-तरुणींना अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. पोलिसांनी कॉफी शॉप चालवणाऱ्या दुकानदारांनाही ताब्यात घेतलं आहे.
लातूर हे शैक्षणिक हब असल्यामुळे संपूर्ण राज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. याचाच फायदा घेत शहरात ठिकठिकाणी कॉफी शॉप सुरु झाले आहेत. कॉलेजच्या परिसरात कॉफीशॉप्सची संख्या लक्षणीय आहे. काही कॉफीशॉपमध्ये कार्डबोर्डचे कम्पार्टमेन्ट बनवण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर
मुंबई
Advertisement