एक्स्प्लोर

पोलीस व्हायचं स्वप्न अधुरं, सरावादरम्यान भरधाव वाहनाची धडक, लातूरमधील तरुणाचा मृत्यू  

Latur News Update : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. लातूर-औसा राष्ट्रीय महामार्गावर बुधोडा गावाजवळील आलमला मोड येथे ही घटना घडली आहे.

Latur News Update : लातूरमध्ये हृदय हेलावणारी घटना घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. लातूर-औसा राष्ट्रीय महामार्गावर बुधोडा गावाजवळील आलमला मोड येथे ही घटना घडली आहे. सूरज अशोक कांबळे असं मयत तरुणाचं नाव आहे. या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून औसा पोलीस पुढील तपास करत आहेत.   सूरजच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अलमला गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  सूरज रोज सकाळी पोलीस भरतीसाठी सराव करत असायचा. नेहमीप्रमाणे आजही तो घराबाहेर पडला, पण घरी परतलाच नाही. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सूरजला भरघाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला एक मित्र जखमी झाला आहे. त्याच्यावर लातूरमधील सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलीस होण्यासाठी मेहनत 

लहानपणापासून सूरजला पोलीस खात्याचे आकर्षण असल्याने तो पोलीस भरतीसाठी दररोज धावणे आणि अन्य शारीरिक कसरती करत असे. त्यासाठी रोज पहाटे चार वाजल्यापासून मेहनत करत होता. आज सकाळी ही तो नेहमीप्रमाणे लवकर घराबाहेर पडला होता. मात्र भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. याता त्याचा जागीच मृत्यू झाला.  

स्वप्न भंगलं

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील अलमला येथे सूरजचा जन्म झाला. लहानपणापासून सूरजला पोलीस दिसले की मोठे कौतुक वाटायचं, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. आपणही मोठं झाल्यावर पोलीसच होणार असल्याचं तो आई वडिलांसह प्रत्येकाला सांगायचा. एवढंच नाही तर लहानपणी तो पोलीसांचा पोषाखही देखील अगदी हट्ट करून घालायचा. पोलीस व्हायचं स्वप्न उराशी बाळगूनच सूरज मोठा झाला. त्याने शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेत असल्यापासूनच तो पोलीस भरतीसाठी सराव करत होता. आज देखील नेहमीप्रमाणे तो सरावाला गेला आणि त्याच्यावर काळानं घाला घातला.  

वाहनाचा शोध सुरू

दरम्यान, सूरज याला धडक दिल्यानंतर चालकाने वाहनासह घटनास्थळाहून पळ काढला आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. धडक दिलेले वाहन सापडल्यानंतरच हा अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती मिळेल, असे पोलीसांनी सांगितले. शिवाय आम्ही लवकरच या वाहनाचा शोध घेऊ अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेत सभा घ्यावी- संदीप देशपांडेABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Embed widget