78 लाखांचा खर्च करुन तयार केलेला रस्ता एका महिन्यात उखडला, लातूरच्या औसामधील धक्कादायक प्रकार
रस्ता वाजत गाजत तयार करण्यात आला. मात्र, काही दिवसातच रस्त्यावरील डांबर आणि खडी निघून गेली. आता फक्त राहिला आहे तो मुरूम. डांबरी रस्ता हाताने काढणे सहज शक्य आहे.
Latur news: लातूरमधील औसामध्ये तब्बल ७८ लाख रुपये खर्चून तयार केलेला रस्ता पहिल्याच पावसात उखडून गेला आहे. कासार बालकुंदा ते मिरगाळ येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक संतापले असून वाजत गाजत तयार केलेला रस्ता अवघ्या महिना दोन महिनेच टिकला असून नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतोय.
राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अशात जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर पावसाने सखल भागात पाणी साचलेलं आहे. तर रस्त्यांवर पाणीचं पाणी झाल्यानं, नुकत्याच बनवण्यात आलेल्या रस्त्यावरचं सगळं डांबर उखडून गेलं आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
वाजत गाजत तयार केलेला डांबरी रस्ता गेला उखडून
लातूरमधील औसा मतदारसंघातील कासार बालकुंदा ते मिरगाळ हा रस्ता तयार होऊन काहीच दिवस झाले आहेत. तब्बल ७८ लाख खर्चून वाजत गाजत तयार केलेला हा डांबरी रस्ता आता उखडून निघत आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरचा डांबर हातानं निघून जात आहे. रस्त्यावर गिट्टी आणि चिखल तयार होत आहे. वाहतुकीला यामुळे अडचण निर्माण होत आहे.
अवघ्या महिनाभरात रस्त्याची दुरावस्था
एक-दीड महिन्यातच रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. बऱ्याच दिवसापासून या रस्त्याची मागणी होती. त्यानंतर रस्ता वाजत गाजत तयार करण्यात आला. मात्र, काही दिवसातच रस्त्यावरील डांबर आणि खडी निघून गेली. आता फक्त राहिला आहे तो मुरूम. डांबरी रस्ता हाताने काढणे सहज शक्य आहे. त्यामुळे अशाप्रकारे रस्ता निर्माण करून नेमका ग्रामीण भागाचा शहराशी कनेक्ट कसा करायचा? ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी लोकांना दळणवळणाची साधने वापरताना आता जीव मुठीत घेऊ प्रवास करावा लागत आहे, अशा तक्रारी आता ग्रामस्थ करत आहेत.
लोणावळा लगतच्या मळवलीमध्ये बंगल्यात पर्यटक अडकले, पर्यटकांना बाहेर काढण्यात यश
लोणावळा आणि परिसरात (Lonavala Rain) तुफान पाऊस बरसतोय, ढगफुटी सदृश्य पावसाने सखल भागात पाणी साचलं आहे. याच पाण्यामुळं मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. पैकी 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे, उर्वरित पर्यटकांना ही काही वेळातच बाहेर काढण्यात येईल. हे सगळे पर्यटक बंगल्यात बसले होते, मात्र बाहेर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याची कल्पना यांना नव्हती. बाहेर येऊन पाहिलं असता चहुबाजूंनी पाणी झाल्याचं दिसून आलं. आता या सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात येत आहे.
हेही वाचा: