हे लातूर हाय पिल्लू.... आमदार अमित देशमुखांचा टोला, काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले
विकास कामावरुन लातूरमध्ये (Lartur) भाजप (Bjp) आणि काँग्रेस (Congress) आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं.

लातूर : विकास कामावरुन लातूरमध्ये (Lartur) भाजप (Bjp) आणि काँग्रेस (Congress) आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 18 येथे अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या हस्ते पार पडणाऱ्या विकास कामाच्या भूमिपूजनाला भाजपने विरोध केला. महानगरपालिकेची एनओसी नसताना विकास कामांबाबत काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय. मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता तरीही गोंधळ उडालाच.
नेमकं प्रकरण काय?
लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 18 या ठिकाणी रस्त्याचा भूमिपूजनाचा आज कार्यक्रम होता. या विकास कामाला भाजपाचे अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी जोरदार विरोध केला. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या विकासकाम भूमिपूजन म्हणजे लोकांची दिशाभूल आहे असल्याचे म्हणत अनेक कार्यकर्ते सोबत घेत भूमिपूजन स्थळे निषेधाचे फलक झळकवले. एकीकडे काँग्रेस कार्यकर्ते हलगीच्या ढोल ताशाच्या तालावर थिरकत होते तर दुसरीकडे भाजप कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी देत विरोध करत होते. पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. यात भाजपाची काही कार्यकर्ते भूमिपूजन स्थळाकडे आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिला आहे. गोंधळ बराच काळ चालला. त्यातच भूमिपूजन देखील संपन्न झालं. विरोधी बाजूला भाजपाचं निषेध आंदोलनही सुरुच होतं. मध्यभागी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.
विकासाच्या आड कोणी येणार असेल तर लातूरकर ते सहन करणार नाहीत
विकास काहींना हवा आहे तर काहींना नको आहे असे म्हणत अमित देशमुख यांनी भाजपला टोला लगावला. विकासाच्या आड कोणी येणार असेल तर लातूरकर ते कदापी सहन करत नाहीत. लातूकर नेहमी विकासाच्या बाजूने उभा राहीला आहे. त्यामुलं काल आज आणि उद्या हे लातूर हाय पिल्लू असे म्हणत अमित देशमुखांनी भाजपवर टीका केली.
लातूरकर वेळीच न्यायनिवाडा करतील
लातूरमध्ये कधीही कोणी कायदा हातात घेत नव्हते. पण आज कायदा कोणीतरी हातात घेत आहे, याचे दर्शन लातूरकरांना होत आहे. लातूरमध्ये एखाद्या पोरानं यावं आणि पुढारपण करावं याची गरज नाही. ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी पुढारपण करा असे अमित देशमुख म्हणाले. निवडणुका झाल्यानंतर समाजाची सेवा करायची असते. समाजाची सेवा करताना कोणी व्यत्यय आणत असतील तर लातूरकर वेळीच न्यायनिवाडा करतील असे अमित देशमुख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
BJP leader Stunt in Farm: पैशांअभावी वृद्ध शेतकरी नांगराला स्वत: जुंपला, पण भाजप नेत्याला स्टंटबाजीचा सोस आवरेना, लातूरमधील घटनेमुळे संताप























