या कॅबिनेट मंत्र्याच्या मध्यस्थीनं उपोषणकर्त्यांची उपचारास संमती, सोयाबीनच्या उपोषणाचा आज 11वा दिवस
सरकारला वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या विविध मागणी संदर्भात कोणतीही भूमिका घेण्यात येत नाही. यामुळे विजयकुमार घाडगे पाटील यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं.
Latur: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच सोयाबीनला आडेआठ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मागील 11 दिवसांपासून उपोषण सुरु असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. या काळात त्यांनी उपचार घेण्यालाही नकार दिला होता. दरम्यान, आज कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या मध्यस्थीने सोयाबीन उपोषणकर्त्यांनी आज उपचार घेण्यास संमती दिली आहे.
सरकारला वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या विविध मागणी संदर्भात कोणतीही भूमिका घेण्यात येत नाही. यामुळे विजयकुमार घाडगे पाटील यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. मागील १० दिवसात त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. उपचार घेण्यासाठी ही त्यांनी नकार दिला होता. आज कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी विजयकुमार घाडगे यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवारही सोबत होते. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याशी बोलून योग्य तो मार्ग काढला जाईल असा आश्वासन देण्यात आले असून त्यानंतर विजयकुमार घाडगे पाटील यांनी उपचार घेण्याला संमती दिली.
सोयाबीनच्या भावासाठी 10 दिवसांपासून आंदोलन सुरु
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच सोयाबीनला साडेआठ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मागील अकरा दिवसापासून उपोषण सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा संघटनेची विजयकुमार घाडगे पाटील हे अमरन उपोषण करतायेत. मागील अकरा दिवसापासून हे उपोषण सुरू आहे. या काळात त्यांनी उपचार घेण्यालाही नकार दिला होता. सरकारला वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या विविध मागणी संदर्भात कोणतीही भूमिका घेण्यात येत नाही. यामुळे विजयकुमार घाडगे पाटील यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान दुसरीकडे लातूरमध्ये शेतकरी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमधील हा संवाद आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
शेतकरी-महावितरणचा व्हिडिओ व्हायरल
शेतकरी आणि महावितरण यांचा सातत्याने संबंध येत असतो, कारण शेतीसाठी वीज हा अनिवार्य घटक बनला आहे. त्यामुळे, वीजेच्या अडचणीसंदर्भाने शेतकरी महावितरण कार्यालयात खेटे मारतात, अनेकदा त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासन दिलं जातं. पण, प्रत्यक्ष काम केलं जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटून ते अरेरावी किंवा मारहाण करतात. तर, कधी शेतकरी देखील आपल्या कामासाठी अडून बसतात आणि वाद घालतात. आता, लातूर (Latur) जिल्ह्यातील हाडोळती येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. आजच्या तारखेत शेतातलं काम कर, अन्यथा मार खाशील असं म्हणत शेतकऱ्यांना (Farmer) मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हेही वाचा:
शेतकऱ्याची सटकली... महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण; व्हिडिओ तुफान व्हायरल