एक्स्प्लोर
10 सेकंदात 10 लाख लंपास, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लूट

लातूर : महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्सचे कर्मचारी बनसोडे बँकेतून नुकतेच ऑफिससमोर आले. बँकेतून काढलेले 10 लाख रुपये त्यांनी गाडीच्या डिक्कीतून बाहेर काढले. त्याच वेळी दोन तरुण पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे आले आणि पैशांसह परागंदा झाले. बनसोडेंनी 10 लाख रुपये गाडीच्या डिक्कीतून बाहेर काढले, त्याचवेळी त्यांचा पाठलाग करत एक बाईकस्वार आणि त्याच्या मागोमाग त्याचा साथीदार दाखल झाले. पत्ता सांगण्यात बनसोडे गुंग होते आणि त्यांच्या हातात दहा लाखांची रक्कम असलेली पिशवी होती. बनसोडेंच्या याच अवस्थेचा फायदा त्या दोघांच्या साथीदारांनी घेतला आणि बाईकच्या मागे बसलेल्या चोरट्याने ती पिशवी हिसकावत क्षणार्धात पोबारा केला. काही कळायच्या आत सारं घडलं होतं. एकच धावपळ उडाली. इतर कर्मचाऱ्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. अखेर गाडी बाहेर काढली. शोधाशोध झाली, पण त्यांचा थांगपत्ता लागला नाही. हल्ली चोरी करण्याचे नवनवीन प्रकार चोरट्यांनी आत्मसात केले आहेत.. त्यामुळे बँकेतून पैसे काढताना, भरताना थोडी काळजी घेतली, तर अशी फसगत तुम्ही नक्की टाळू शकता.
आणखी वाचा























