(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar : लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबांनंतरचा मोठा आघात ; रश्मी ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata Mangeshkar ) यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata Mangeshkar ) यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरात शोककळा पसरली आहे. देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
"लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारस्तंभ होत्या. सर्व सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दीदींच्या जाण्यामुळे आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे. बाळासाहेब असताना आणि नंतर देखील लतादीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दीदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दीदी आज आपल्यात नाहीत. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली." अशा शब्दांत रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. 30 जानेवारी रोजी लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर आय.सी.यू मध्ये उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली.
लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं.
महत्वाच्या बातम्या
- Lata Mangeshkar : लतादीदी यांनी व्यक्त केली होती 'ही' खंत, म्हणाल्या...
- Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!
- Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट
- Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास