एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होणार? मुख्यमंत्री शिंदेंची नवी माहिती

Ladki Bahin Yojana : 17 ऑगस्टला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत.

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे 17 ऑगस्टला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. एकाच वेळी महिलांच्या खात्यात  3 हप्त्यांचे म्हणजे एकूण 4 हजार 500 रुपये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे.  31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

योजनेसाठी 33 हजार कोटी आर्थ‍िक तरतूद 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन-प्रशासनाच्या मेहनतीमुळं हे शक्य झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी 33 हजार कोटी आर्थ‍िक तरतूद करण्यात आली आहे. ही यापुढेही कायम सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

बहिणींच्या हाताचे हे चटके कमी करण्यासाठीच योजना आणली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना‌ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचा संदर्भ दिला. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर’ जळगावच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या बहिणाबाईंचं हे काव्य आहे. संपूर्ण जगणे, आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलंय. संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतात. बहिणींच्या हाताचे हे चटके कमी करण्यासाठीच आम्ही राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. या योजनेत मोठ्या प्रमाणात ममहिलांनी सहभाग घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा हप्ता मिळण्यासाठी उरले फक्त 3 दिवस, प्रशासनाची तयारी पूर्ण 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Esther Anuhya case : इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Jalna : मनोज जरांगेंच्या आंदोलनात धनंजय देशमुख सहभागABP Majha Marathi News Headlines 12 PM Headlines at 12PM 28 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 28 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सMohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा
Esther Anuhya case : इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
इंजिनिअर तरुणीची बलात्कारानंतर हत्या, हायकोर्टाने फाशी सुनावलेला चंद्रभान सानप सुप्रीम कोर्टात निर्दोष!
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची  लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट, वाचा शब्द जसाच्या तसा
Bill Gates Pandemic: जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
जगावर पुन्हा मोठं संकट येणार? चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Beed Police: बीडमध्ये पोलिसांसाठी आदेश, आडनाव घ्यायचं नाही, नावाने हाक मारायची; पोलीस अधीक्षक नवनीत कावतांनी फर्मान सोडलं
बीडमधील जातीयवादाला SP कावतांचा सुरुंग, आडनाव घ्यायचं नाही, एकमेकांना नावाने हाक मारा, पोलिसांना आदेश
Embed widget