एक्स्प्लोर
Advertisement
कोपर्डी प्रकरण : सुनावणी सुरु, पहिल्या दिवशी काय घडलं?
अहमदनगर : कोपर्डी बलात्कार प्रकरणावर आजपासून अहमदनगर सत्र न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. या प्रकरणात जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. या तिन्ही संशयित आरोपींना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
संतोष भवाळ आणि जितेंद्र शिंदे या दोन संशयित आरोपींनी सरकारी वकिलांची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणाची उर्वरित सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. तर नितीन भैलुमे या संशयित आरोपीने जामीन मिळावा, तसेच खटल्यातून मुक्त करावं, यासाठी वकिलामार्फत अर्ज केला आहे. त्यावर पुरावा आणि साक्षीदाराची माहिती घेऊन उद्या सुनावणी होणार आहे.
कोपर्डी प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची सरकारने सूचना दिली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.
नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले, "आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा."
संबंधित बातम्या
कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट ! कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाईअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement