Gold Rate : सोने चांदीचे दर उच्चांकावर, सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळं सोने आणि चांदीच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे.

Gold Silver Price नवी दिल्ली : आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्याचे एका तोळ्याचे दर 2883 रुपयांनी महागले आहेत. चांदीच्या दरात एका दिवसात 14475 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा जीएसटीशिवायचा दर 257283 रुपये किलो इतका आहे. जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 265001 रुपये किलो आहे. तर, सोन्याचा जीएसटीशिवायचा एका तोळ्याचा दर 140005 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर 144205 रुपयांवर पोहोचला आहे.
शुक्रवारी चांदीचे दर 242808 रुपये किलोवर होते. तर, सोन्याचा दर 137122 रुपये एक तोळा होता. जीएसटीशिवायचा सोन्याच्या दराचा उच्चांक मोडला गेला आहे. जीएसटीशिवाय एक तोळे सोन्याचा यापूर्वीचा उच्चांक138181 रुपये होता. चांदीच्या दरानं देखील 7 जानेवारीचा 248000 चा उच्चांक मोडला आहे.
सराफा बाजारात ज्या प्रमाणं 24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याप्रमाणं 23 कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. 23 कॅरेट सोन्याचा दर 2871 रुपयांनी वाढून 139444 रुपये तोळावर पोहोचला आहे. जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 143627 रुपये किलो आहे.
22 कॅरेट सोन्याच्या दरात 2641 रुपयांची वाढ झाली आहे. आज एक तोळे सोन्याचा दर 128245 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचा एखा तोळ्याचा दर 132092 रुपये किलो आहे.
18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 105004 रुपये इतका आहे. जीएसटीसह याचा दर 108154 रुपये आहे. 14 कॅरेट सोन्याच्या दरात 1687 रुपयांनी वाढ झाली असून एका तोळ्याचा दर 81903 रुपये आहे.
सोन्याच्या दरात तेजी का?
सोने आणि चांदीच्या दरातील वाढीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कारणं देखील आहेत. 2025 मध्ये सोन्याच्या दरात 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरानं उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर 4600 डॉलर प्रति औंस इतका आहे. तर चांदीचा दर 84.5 डॉलर प्रति औंस इतका आहे. भूराजनैतिक संघर्षामुळं निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांची निवड करतात. अमेरिकेच्या व्याज दरातील कपातीची आशा आणि अमेरिकन डॉलरमधील नरमाई हे देखील एक कारण आहे.
चांदीचे दर वाढण्याचं कारण म्हणजे औद्योगिक कारणासाठी चांदीचा वापर वाढला आहे. सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चांदीचा औद्योगिक वापर वाढला आहे. यामुळं चांदीच्या दरावर दबाव आहे.
दरम्यान, इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात. देशभरात सोने आणि चांदीचे दर सर्वत्र सारखे असतात. आयबीजेएकडून दिवसातून दोन वेळा दर जाहीर केले जातात. आयबीजेएकडून जारी केले जाणारे दर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस शिवायचे असतात.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)























