एक्स्प्लोर

अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक

नगरपालिकेत आज स्विकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत परत 'भाजप-एमआयएम' युती वेगळ्या रूपात समोर आली.

अकोला : गेल्याच आठवड्यात भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत आणि अकोल्यातली (Akola) अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केल्याने चांगलाच गदारोळ उठला होता. त्यानंतर, भाजपनेही BJP) या दोन्ही ठिकाणी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावत कारवाई केली, तसेच अशी युती कदापि मान्य नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र, अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक समोर आला आहे. 'एमआयएम'कडून स्विकृत नगरसेवकपदी भाजपाच्या माजी नगराध्यक्षाचे पुत्र जितेश बरेठिया यांना 'एमआयएम'च्या (MIM) पाचही नगरसेवकांनी समर्थन दिलं. त्यामुळे, भाजप नेत्याच्या मुलाला नगरसेवक होण्यासाठी एमआयएमची मदत झाल्याने ही अप्रत्यक्ष युतीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अकोला जिल्ह्यतील अकोटमध्ये झालेल्या 'भाजप-एमआयएम' युतीवरून देशभरात मोठा गदारोळ उडाला होताय. या 'अभद्र' युतीची बातमी सर्वात आधी 'एबीपी माझा'ने दाखविली होती. या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही युती तोडण्याचे आदेश दिले. तर या युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस पाठवली. या सर्व घडामोडीनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडला होता. त्यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वत:चा गट स्थापन केला होता. मात्र, पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज परत ही युती नव्याने वेगळ्या रूपात परत आली आहे.

नगरपालिकेत आज स्विकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत परत 'भाजप-एमआयएम' युती वेगळ्या रूपात समोर आली. एमआयएमकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून ताज राणा यांचं नाव आलं होतं. यासोबतच एमआयएमने भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिलीय. यात ताज राणा यांनी वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आला नाही. त्यामळे एमआयएमकडून एकमेव अर्ज आलेले भाजपचे जितेन बरेठिया हे एमआयएमचे स्विकृत नगरसेवक असतील. आता, एमआयएमचे स्विकृत नगरसेवक पदाचे उमेदवार ताज राणा कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपने एमआयएमसोबत युती करण्यास कारणीभूत असलेले आमदार प्रकाश भारसाकळे आणि शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्यावर अद्यापही कारवाई केली नाही. स्विकृत सदस्यामूळे अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीची परत नव्याने चर्चा सुरू झालीय.

दरम्यान, भाजप-एमआयएमच्या या पाठिंब्यावर आणि युतीवर काँग्रेस तीव्र शब्दात विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजप आणि एमआयएम एकच आहे, असेही येथील काँग्रेस नेत्यांनी म्हटलं.

भाजप नेत्याला स्विकृत नगरसेवक पदासाठी समर्थन देणारे एमआयएमचे 5 नगरसेवक :

1) आफरीन अंजुम शरीफोद्दीन : गटनेता

2) दिलशादबी रज्जाक खा

3) रेशमा परविन मोहम्मद अजीम

4) डॉ. युसूफ खान हादीक खान

5) हन्नान शाह सुलतान शाह

हेही वाचा

मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget