एक्स्प्लोर

...म्हणून कोपर्डी बलात्कार खटला 2 जानेवारीपर्यंत तहकूब!

अहमदनगर: कोपर्डी बलात्कार खटल्याची सुनावणी 2 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. चौथ्या दिवसाच्या सुनावणीत वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष नोंदवण्यात आली. डॉक्टरांनी घटनाक्रम सांगून पीडितेच्या शरीरावर जखमांचे व्रण असल्याचं सांगितलं. शरीरावर अनेक जखमा होत्या. त्याचबरोबर पीडीतेचे खांदे निखळले असल्याची साक्ष दिली. दुसरीकडे मुख्य आरोपीचे वकिल योहान मकासरे यांची उलट तपासणी पूर्ण झाली. मात्र भैलुमेच्या वकिलांनी मेडिकल रजिस्टरची कागदपत्रे अवश्यक असल्याचं सांगितल्यानं, दोन जानेवारीपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दोन जानेवारीपासून पुन्हा सलग न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे.
कोपर्डी प्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांना प्रत्येक सुनावणीची फी...
यावेळी न्यायालयानं कागद पत्रांसाठी अगोदर मागणी करण्याची सूचना केली. दरम्यान औरंगाबाद उच्च न्यायालयाने नितीन भैलुमेचा जिल्ह्याबाहेर खटला चालवण्याचा अर्ज फेटाळला. कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. पहिल्या दिवसाची सुनावणी कोपर्डी बलात्कार प्रकरणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात 21 डिसेंबरपासून नियमित सुनावणीला सुरूवात झाली. फिर्यादीसह 3 साक्षीदारांची तपासणी केली गेली आहे. पीडित मुलीचे वडील सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. दुसऱ्या दिवसाची सुनावणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात कोपर्डी खटल्याची सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सुनावणीत फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शीची साक्षी नोंदवण्यात आली. यावेळी फिर्यादीनं घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. सायंकाळी दुचाकीवरुन कोपर्डीला जाताना पीडित मुलीची सायकल रस्त्याकडेला दिसली. पीडितेला हाका मारल्यानंतर तिचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आरोपी जितेंद्र शिंदे पळताना दिसल्याचं सांगितलं, तर पीडिता नग्न अवस्थेत पडल्याचं आढळून आलं. त्यानंतर आरोपीचा पाठलाग केला. मात्र तो पळून गेल्याचं सांगितलं. तर परत आल्यावर पीडित मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात आल्यानं रुग्णालयात दाखल करुन पोलीसांत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळ दाखवून पीडित मुलीची सायकल, आरोपीच्या चपला दाखवल्याची साक्ष नोंदवण्यात आली. तर गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी आरोपींच्या वकिलांनी खटल्याची सुनावणी दुसऱ्या कोर्टात घेण्याचा अर्ज केला होता. मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा मुद्दा खोडून काढून विरोध केला. त्यानंतर आरोपींच्या वकिलानं अर्ज काढून घेतला. दरम्यान सुनावणीवेळी पीडीत मुलीचे वडीलही प्रथमच न्यायालयाच्या आवारात आले होते. तिसऱ्या दिवसाची सुनावणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी कोपर्डी बलात्कार खटल्याची सुनावणी पार पडली. सुनावणीत फिर्यादी आणि मुख्य साक्षीदाराची उलट तपासणी घेण्यात आली. सुनावणीवेळी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या आरोपींना न्यायालयात हजर होते. यावेळी सुनावणीत आरोपीचे वकील योहान मकासरे यांनी फिर्यादीच्या साक्षीवर अक्षेप घेतले. घटनास्थळाची दिशा, घटनास्थळाचं अंतरावरुन फिर्यादीच्या साक्षीवर अक्षेप घेतला. त्याचबरोबर घटनास्थळी सापडलेली चप्पल, आणि दुचाकी आरोपीची नसल्याचा युक्तीवाद केला. तर घटनास्थळची सायकलही पीडितेची नसून फिर्यादीला स्वतःच्या दुचाकीचा नंबरही आठवत नसल्याचा युक्तीवाद मकासरे यांनी केला. त्याचबरोबर बॅटरीचा उल्लेख एफआयआरमध्ये नसल्याचा युक्तीवादही त्यांनी केला. तर फिर्यादी सरतपासणीच्या साक्षीवर कायम राहिला. सुनावणीवेळी पीडीत मुलीची सायकल आणि आरोपीची अर्धवट जाळालेली दुचाकी प्रथमच न्यायालयात आणण्यात आली होती. यावेळी फिर्यादीने सायकल आणि दुचाकी ओळखली. दरम्यान शुक्रवारी डॉक्टर आणि शिक्षकांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. संबंधित बातमी
कोपर्डी बलात्कार प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु
कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार 
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Monsoon Trek : पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Lok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Monsoon Trek : पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Embed widget