(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Konkan Land Slide : दरड कोसळून तिघांचा मृत्यू, गेल्या वर्षीची घटना; आता 9 अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Konkan Land Slide News : चिपळूणमधील पेढे - कुंभारवाडी परशुराम गावात गतवर्षी अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 9 अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Konkan Land Slide News : गेल्या वर्षी कोकणात अतिवृष्टीनं (Konkan Rain Updates) हाहाकार माजवला होता. या अतिवृष्टीनं गावच्या गावं पाण्याखाली गेली होती. सोबतच काही ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी देखील झाली होती. चिपळूणमधील पेढे - कुंभारवाडी परशुराम गावात गतवर्षी अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. या प्रकरणी 9 अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेस मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रट्रक्चर कंपनीच्या संचालकासह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अधिकारी आणि शाखा अभियंता अशा 9 जणांवर चिपळूण पोलिस स्थानकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Mumbai Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा