एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सिक्स पॅकच्या हट्टापायी चुकीचा आहार, तरुणाच्या हृदयात ब्लॉकेज

कोल्हापुरात चुकीच्या आहारामुळे 24 वर्षीय तरुणाच्या हृदयामध्ये 'ब्लॉकेज' निर्माण होऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर : चित्रपटातील हिरोप्रमाणे आकर्षक पिळदार शरीरयष्टी व्हावी, लक्ष वेधून घेणारे सिक्स पॅक असावेत अशी अनेक तरुणांची इच्छा असते. मात्र शास्त्रशुद्ध मार्गदर्शन न घेता अतिरेकी सप्लिमेंट्स घेणं कोल्हापुरातील तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. 24 वर्षीय तरुणाच्या हृदयामध्ये 'ब्लॉकेज' निर्माण झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. कोल्हापुरात राहणाऱ्या संबंधित तरुणाचं लग्न ठरवण्याबाबत कुटुंबीयांच्या हालचाली सुरु होत्या. पिळदार शरीरयष्टी बनवून जोडीदाराला प्रभावित करण्यासाठी त्याने जिमला जाण्यास सुरुवात केली. किरकोळ शरीरयष्टी असल्यामुळे 'सप्लिमेंट' पावडर घेण्याचा सल्ला तरुणाला त्याचे मित्र आणि ट्रेनरने दिला. आहारात दररोज बारा अंडी घेण्यासही सांगितलं. तरुणाने तसा आहार घ्यायला सुरुवात करताच पाचव्या दिवशी त्याला छातीत दुखून अस्वस्थ वाटायला लागलं. दोन दिवस पित्त जास्त झालं असेल, असं गृहित धरुन तरुणाने त्यावर मेडिकल दुकानातून औषधाच्या गोळ्या घेतल्या आणि छातीतील दुखण्याकडे दुर्लक्ष केले. व्यायाम करताना छातीत प्रचंड दुखू लागल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी या तरुणाच्या हृदयाची अँजिओग्राफी करताच हृद्यातील रक्तवाहिन्यांत अडथळे निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. हृदयरोग विभागातील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन शस्रक्रिया केली आणि त्याचा जीव वाचवला. हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. अल्पावधीत बॉडी कमावण्याच्या नादात तरुणाईने मान्यता नसणाऱ्या सप्लिमेंट पावडरींचं सेवन करु नये. डॉक्टर किंवा अनुभवी न्युट्रीशिअनच्या सल्ल्याने आहारात बदल करावेत. अनुभव नसलेल्या मार्गदर्शकांकडून घेतलेला सल्ला जीवावर बेतू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं. ट्रेनरकडे त्या विषयातील शास्त्रीय ज्ञान आहे का,त्याने आवश्यक शिक्षण घेतले आहे का, याची खात्री करावी. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्याने व्यायाम प्रकार आणि आहाराची निवड करताना विशेष दक्षता घ्यावी लागते. सध्याची पिढी आरोग्याबाबत सजग आहे. जिमकडे तरुणाईचा वाढलेला कल कौतुकास्पद असला तरी ट्रेनर निवडताना आणि आहार घेताना काळजी घेणं गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराजRamdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-Sunil Bhusara Mumbai : मला मिळायला हवी ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली - सुनील भुसारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget