एक्स्प्लोर

Kolhapur : कोल्हापुरात लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त, एफडीएची कारवाई

कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या कंपन्यांवर धाड टाकत जवळपास हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त, ऐन दिवाळीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

कोल्हापूर : दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र मिठाईची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोल्हापुरातील तीन कंपनीवर छापा टाकत भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले आहेत. कोल्हापुरातील शिरोळ इथल्या शिवरत्न मिल्क अॅण्ड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट, अमवा मिल्क अॅण्ड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट, गणेश मिल्क प्रॉडक्ट या आस्थापनांवर छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ऐन दिवाळीत या ठिकाणी भेसळयुक्त खवा बनवला जात असल्याचं निदर्शनास आलंय.

कोल्हापूरच्या शिरोळमधील शिवरत्न मिल्क कंपनीवर धाड टाकण्यात आली. यावेळी दूध पावडर (milk powder) आणि दह्यातील पाणी पावडर (whey powder) चा अपमिश्रक म्हणून वापर करून खव्याची उत्पादन, विक्री होत असल्याचे आढळले. यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत 499 किलो भेसळयुक्त खवा आणि एकूण ११ लाख 37 हजार 458 रुपयांचा साठा जप्त केलाय.

VIDEO | बनावट खवा कसा ओळखायचा? | एबीपी माझा

तर कोल्हापूरच्या शिरोळमधील अमवा मिल्क कंपनीवर धाड टाकली असता तेथे खव्या उत्पादनासाठी स्किम्ड दूध पावडर (skimmed milk powder), तेल, दह्यातील पाणी पावडर (whey powder) चा अपमिश्रक म्हणून वापर करत असल्याचे आढळले. अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाईत या कंपनीतून 498 किलो भेसळयुक्त खवा जप्त आणि एकूण 3 लाख 70 हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.

शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील गणेश मिल्क प्रॉडक्टवर देखील अन्न आणि औषध प्रशासनाकडून धाड टाकण्यात आली. यावेळी 431 किलो भेसळयुक्त खवा जप्त आणि 2 लाख 90 हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कंपनीत देखील स्किम्ड दूध पावडर (skimmed milk powder) आणि दह्यातील पाणी पावडर (whey powder) चा अपमिश्रक म्हणून वापर करत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनच्या निदर्शनास आले. 

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाईला मागणी असते, परंतु त्यात निकृष्ट दर्जाचा खवा वापरुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.

वाचा :  Special Report | बनावट खवा बनवणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड, सणासुदीला मिठाई गेताना सावधान! 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
Embed widget