एक्स्प्लोर
कोल्हापुरात चार अट्टल चोरांचा पोलिस कोठडीतून पोबारा
पोलिस गाढ झोपेत असताना शाहूवाडी पोलिस स्टेशनमधून चौघांनी लॉकअप कस्टडीचा गज कापून पलायन केलं.
कोल्हापूर : कोल्हापुरात चार अट्टल चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिस कोठडीतून पोबारा केला आहे. पोलिस गाढ झोपेत असताना शाहूवाडी पोलिस स्टेशनमधून चौघांनी लॉकअप कस्टडीचा गज कापून पलायन केलं.
कैद्यांच्या पलायनामुळे कोल्हापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील सरुड गावातील मोबाईल शॉपीमध्ये काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी कळंबा जेलमधून अट्टल चोरटे सुरज दबडे, ओंकार सूर्यवंशी, गोविंद माळी आणि युवराज कारंडे याना शाहूवाडी पोलिसांनी चौकशीसाठी 16 मे रोजी ताब्यात घेतलं होतं.
पोलिस गाढ झोपेत असताना शुक्रवारी पहाटे या चौघांनी लॉक अपचे गज वाकून पलायन केलं. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असणाऱ्या शाहूवाडी पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला आहे.
संघटितपणे जबरी चोरी करणारी टोळी म्हणून त्यांच्यावर 'मोक्का' कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार होती. मात्र पोलिस ठाण्यातच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हे चौघे पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली असून सात शोध पथकं रवाना करण्यात आली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement