एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आजपासून रणधुमाळी सुरु

कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आजपासून सुरु होणार आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील मुदत संपलेल्या गावांमध्ये निवडणुका होत असून  आज निवडणूक नोटीस प्रसिद्ध केली जाईल.

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आजपासून सुरु होणार आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील मुदत संपलेल्या गावांमध्ये निवडणुका होत असून  तहसीलदारांकडून आज निवडणूक नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित गावांना आचारसंहिता लागू होईल. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे गावागावांतील वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल केले जातील. 5 डिसेंबरला अर्ज छाननी होईल., 7 डिसेंबरला चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. 18 डिसेंबरला मतदान व 20 डिंसेबरला मतमोजणी होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर गटतट करून लढवली जात असली, तरी आगामी विधानसभा पेरणी सुद्धा याच माध्यमातून होणार आहे. थेट सरपंच निवडणूक असल्याने तगडा उमेदवार शोधण्याचेही आव्हान आहे. काँग्रे, राष्ट्रवादी, भाजपसह शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिंदे गटही निवडणुकीच्या रिंगणात असेल. त्‍यामुळे गावांमध्ये चांगलाच संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील 446 सदस्य निवडणुकीसाठी अपात्र

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केलेल्या 446 सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये पाच वर्षांच्या कालावधीकरीता पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र असतील. अशा उमेदवारांची यादी kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 (ब) (1) अन्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये जिल्ह्यातील हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, शाहूवाडी, गडहिंग्लज, पन्हाळा व करवीर तालुक्यातील एकूण 446 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अपात्र ठरविण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्टोबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. 31 मे 2022 पर्यंत अस्‍तित्‍वात असलेली मतदार यादी गृहित धरण्यात आली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील ग्रामपंचायती खालीलप्रमाणे आहेत 

  • करवीर 53
  • कागल 26
  • पन्हाळा 50
  • शाहूवाडी 49
  • हातकणंगले 39
  • शिरोळ 17
  • राधानगरी 66
  • गगनबावडा 21
  • गडहिंग्लज 34
  • आजरा 36
  • भुदरगड 44
  • चंदगड 40

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget