एक्स्प्लोर
ओव्हरटेकिंगच्या रागातून तरुणांची बसचालकाला मारहाण
कोल्हापूर : कोल्हापुरात क्षुल्लक कारणावरुन काही तरुणांनी केएमटी बस चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बसचालकानं ओव्हरटेक करु न दिल्याच्या रागातून हा प्रकार घडला.
ओव्हरटेक करु दिलं नाही आणि समोरुन येणाऱ्या दुचाकीला हॉर्न दिला या रागातून तीन ते चार तरुणांनी बसमध्ये शिरुन चालकाला मारहाण केली. काल संध्याकाळी पेठ वडगावमधल्या अंबाबाई मंदिर परिसरात हा प्रकार घडला.
बसमध्ये धुडगूस सुरु झाल्यानंतर प्रवासीही घाबरुन बसमधून खाली उतरले. कुशाबा जोशी असं बस चालकाचं नाव असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मारहाणीचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालाय. मारहाण करणारे तरुण मात्र अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement